IMPIMP

भाजप सरकारचे समर्थन काढून घेणाऱ्या अपक्ष आमदाराच्या घरावर आयकर विभागाचे छापे ! एकाच वेळी 30 पेक्षा जास्त ठिकणी छापेमारी

by amol
balraj-kundu-raid

चंदीगड : वृत्तसंस्थाहरियाणाचे महम मधील अपक्ष आमदार बलराज कुंडू (Balraj Kundu) यांच्या घरासह 30 पेक्षा जास्त ठिकाणावर एकाच वेळी आयकर विभागानं गुरुवारी छापा टाकाला आहे. आयकर विभागाच्या टीमनं आज सकाळी रोहतकच्या सेक्टरमध्ये असलेल्या त्यांच्या घरावर आणि गुरुग्राममधील घरावर छापा मारला. त्यांच्या पत्नीच्या माहेरी हिसारच्या हांसीमध्ये आणि त्यांच्या दोन भावांच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यांचे व्यवसाय आणि कुटुंबातील सदस्यांच्या घरी देखील छापेमारी झाली.

बलराज कुंडू यांनी 2019 मध्ये हरियाणा विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती. त्यावेळी भाजपनं तिकिट देण्यास नकार दिला होता. भाजपचे उमेदवार समशेर सिंह यांचा कुंडू यांनी पराभव केला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद सिंह दांगी यांनाही पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर त्यांनी मनोहरलाल खट्टर सरकारला समर्थन दिलं होतं. मागील वर्षी त्यांनी खट्टर सरकारचं समर्थन काढून घेतलं होतं.

खास बात अशी की, अपक्ष आमदार बलराज कुंडू (Balraj Kundu) यांनी उघडपणे तिन्ही कृषी कायद्यांचा विरोध करत शेतकऱ्यांचं समर्थन केलं होतं. शेतकरी महापंचायतच्या व्यासपीठावर देखील ते अनेक वर्षे दिसले आहेत. मागील वर्षी माजी सहकार मंत्री मनीष ग्रोवर यांच्यावर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोपही केले होते. परंतु खट्टर सरकारकडून कोणतीही कारवाई झाली नव्हती. हेच कारण होतं की, त्यांनी खट्टर सरकारचं समर्थन परत घेतलं होतं. मुख्यमंत्री भ्रष्ट लोकांचं समर्थन करत आहेत. त्यामुळं ते सरकारचे समर्थन काढून घेत आहेत असं कुंडू यांनी सांगितलं होतं.

Related Posts