IMPIMP

Birendra Saraf | ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ बिरेंद्र सराफ राज्याचे नवीन महाधिवक्ता

by nagesh
Birendra Saraf | senior advocate birendra saraf to be maharashtra new advocate general

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी (Ashutosh Kumbhakoni) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या जागेवर ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ डॉ. बिरेंद्र सराफ (Birendra Saraf) यांची महाधिवक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली. मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी देखील त्यांच्या नावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे बिरेंद्र सराफ (Birendra Saraf) हे राज्याचे नवे महाधिवक्ता (Maharashtra New Advocate General) म्हणून पदभार स्वीकारतील.

 

बिरेंद्र सराफ यांचा परिचय
मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयातून डॉ. बिरेंद्र सराफ (Birendra Saraf) यांनी पदवी प्राप्त केली आहे. विद्यमान सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड (Chief Justice D. Y. Chandrachud) यांच्या चेंबरमध्ये सराफ यांनी बराच काळ कनिष्ठ वकील म्हणून काम केले. सराफ यांची 2020 मध्ये ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तसेच सराफ यांनी सहा वर्षे बॉम्बे बार असोसिएशनचे सचिव म्हणून देखील काम पाहिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बिरेंद्र सराफ यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक मोठी प्रकरणे हाताळली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळात
बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणावत (Bollywood actress Kangana Ranaut) हिच्या घरावर करण्यात आलेल्या
कारवाई प्रकरणात सराफ यांनी कंगनाची बाजू हायकोर्टात (Bombay High Court) मांडली होती.
ज्यात हायकोर्टानं कंगनाच्या बाजूने निकाल देत मुंबई महापालिकेला (Mumbai Municipal Corporation)
दोन कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले होते.

 

Web Title :- Birendra Saraf | senior advocate birendra saraf to be maharashtra new advocate general

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | जाहिरात फलकांचे दर 222 रुपयांवरून 576 रुपये प्रति चौ. फूट होणार; महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव

Pune PMC News | अग्निशमन सेवा शुल्क वाढीचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

BJP MLA Nitesh Rane | आमदार नितेश राणे यांचा सातारा पोलिसांना इशारा, म्हणाले- “माझ्यासमोर सिंघमगिरी करू नका, नाहीतर…”

Sandeep Karanje | सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी संदीप कारंजे

 

Related Posts