IMPIMP

Pune PMC News | जाहिरात फलकांचे दर 222 रुपयांवरून 576 रुपये प्रति चौ. फूट होणार; महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाचा स्थायी समितीसमोर प्रस्ताव

by nagesh
Pune PMC - Uruli Devachi - Fursungi | The demand to create an independent municipality or municipality excluding villages is 'political'! Pune PMC News Uruli Devachi - Fursungi Hadapsar & Wagholi

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune PMC News | शहरात लागणार्‍या जाहिरात फलकांच्या दरांमध्ये वाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार महापालिकेच्या जुन्या हद्दीतील जाहिरात दरामध्ये २०१३ पासून दरवर्षी १० टक्के तर नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या ३४ गावांमध्ये जाहिरात दरामध्ये ५० टक्के वाढ सुचविण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. हे नवीन दर मंजूर झाल्यास सध्या २२२ रुपये दराने होणारी आकारणी थेट ५७६ रुपये प्रति चौ. फूट होणार आहे. (Pune PMC News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शहरामध्ये सार्वजनिक ठिकाणी तसेच खाजगी जागेवर करण्यात येणार्‍या व्यावसायिक जाहिरात फलकांसाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडून जाहिरात शुल्क आकारण्यात येते. शहरात सुमारे अडीच हजार अधिकृत जाहिरात फलक (होर्डींग) असून दिवसेंदिवस याची संख्या वाढत आहे. तसेच खांबांवर लावण्यात येणार्‍या जाहिरात फलकांचे प्रमाणही खूप मोठे आहे. महापालिकेच्या हद्दीमध्ये २०१७ पासून समाविष्ट करण्यात आलेल्या ३४ गावांमध्ये देखिल मोठ्याप्रमाणावर जाहिरात फलक लावण्यात आलेले आहेत. महापालिकेची परवानगी घेउन लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांसोबत मोठ्या संख्येने अनधिकृत जाहिरात फलक लावण्यात आलेले आहेत. (Pune PMC News)

 

महापालिका २०१३ मध्ये प्रत्येक चौरस फूटासाठी २२२ रुपये दर आकारते. परंतू या दरावरून काही होर्डींग व्यावसायीक उच्च न्यायालयात गेले आहेत. न्यायालयामध्ये काही महिन्यांपुर्वी झालेल्या सुनावणीमध्ये अंतिम निर्णय होईपर्यंत काहीप्रमाणात थकबाकी भरून घ्यावी असे आदेश दिले असून त्यानुसार महापालिकेने १११ रुपये प्रति चौ.फूटाप्रमाणे आकारणी करून नियमित मान्यता देण्यास सुरूवात केली आहे. त्याचवेळी महापालिकेने अनधिकृत फलकांवर जोरदार कारवाई सुरू केली आहे.

 

दरम्यान, मागील दहा वर्षात जाहिरात शुल्कामध्ये वाढ करण्यात आलेली नाही.
या पार्श्‍वभूमीवर आकाशचिन्ह परवाना विभागाने चलन वाढ दरानुसार तसेच उच्च न्यायालयामधील याचिकेवरील
निर्देशानुसार २०१३ ते २०२२ पर्यंतची वाढ गृहीत धरून पुढील तीन वर्षांकरिता दरवर्षी १० टक्के दरवाढ तर
नव्याने समाविष्ट झालेल्या ग्रामपंचाय हद्दीतील जाहिरात फलकांना ५० टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला आहे.
महापालिकेमध्ये सध्या प्रशासक असल्याने या दरवाढीला मान्यता मिळणे जवळपास निश्‍चित मानले जात आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

२०२२-२३ चे जाहिरात फलक दर असे असतील
२०१३ मध्ये जाहिरात फलकांचा प्रति चौ.फूट दर २२२ रुपये होता.
यामध्ये २०१३-१४ पासून पुढे दरवर्षी १० टक्के वाढ करण्यात येणार असून २०२२-२३
मध्ये हाच दर प्रति चौ. फूट ५७६ रुपये इतका होणार आहे.

 

Web Title :- Pune PMC News | The rate of billboards will be increased from Rs 222 to Rs 576 per sq.ft; Proposal of Sky Signs Department of Municipal Corporation before the Standing Committee

 

हे देखील वाचा :

Pune PMC News | अग्निशमन सेवा शुल्क वाढीचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

BJP MLA Nitesh Rane | आमदार नितेश राणे यांचा सातारा पोलिसांना इशारा, म्हणाले- “माझ्यासमोर सिंघमगिरी करू नका, नाहीतर…”

Sandeep Karanje | सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी संदीप कारंजे

CP Vinay Kumar Chaubey | विनय कुमार चौबे यांनी स्वीकारला पिंपरी-चिंचवड आयुक्त पदाचा पदभार

 

Related Posts