IMPIMP

BJP-MNS Alliance | पुणे महापालिकेसाठी भाजप-मनसे युती नाही?, राज ठाकरेंनी स्पष्ट केली भूमिका

by nagesh
BJP-MNS Alliance | no alliance with bjp in pune municipal elections says MNS Chief raj thackeray

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन भाजप-शिवसेना युती (BJP-Shiv Sena alliance) तुटल्यानंतर भाजपसोबत मनसे युती (BJP MNS Alliance) करणार असल्याच्या चर्चांना मध्यंतरी उधाण आले होते. आगामी महापालिका निवडणुकीत (Pune Municipal Elections) भाजप-मनसे युती होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, आता मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपसोबत युती होणार नाही. करायची असल्यास, त्याच निर्णय मी घेईन असे सांगत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच पक्षसंघटना बळकट करा, त्या जिवावर तुम्ही निवडून येणार आहात. भाजपच्या जिवावर तुम्ही मोठे होणार नाहीत, असा सल्लाही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. (BJP-MNS Alliance)

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

पुण्यातील (Pune) विधानसभानिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी बुधवारी घेतल्या. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या बैठकीला शाखाप्रमुख, विभाग उपाध्यक्ष, शाखा उपप्रमुख यांनाच प्रवेश देण्यात आला होता. शहरातील पक्षाचे पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांची बैठक शुक्रवारी (दि.17) होणार आहे. राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतानाच त्यांना पक्षसंघटना वाढवण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात, याच्या सूचना दिल्या. (BJP-MNS Alliance)

 

बैठकीनंतर कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांनी सांगितले की, राज ठाकरे व पक्ष म्हणून मी मतदारांपर्यंत पोहचलो आहे. आता तुम्ही मतदारांना घरोघरी जाऊन भेटा. जनसंपर्क (Public relations) वाढवा. सोशल मीडियाचा वापर कमी करा. पक्षातील भेद विसरुन एकत्र काम केले तर पक्षाची ताकद वाढेल. त्यामुळे तुम्ही विजयी होऊ शकता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

काय करायचे मी ठरवीन
राज ठाकरे म्हणाले, मी मुंबईतून पुण्यात तुमच्यासाठी येतो. तुम्ही एकमेकांना पाडण्यात गर्क असाल तर काय उपयोग? भाजपची युती होणार की नाही, याची चर्चा करु नका. त्यांच्याकडून काही निरोप आल्यास, काय करायचे ते मी ठरवीन. सध्या सर्वांनी पक्षबांधणीवर लक्ष द्यावे. मी सांगितलेले येत्या महिनाभरात न ऐकल्यास मी तुम्हाला बदलेन असेही राज ठाकरे यांनी सांगितले. यावेळी सरचिटणीस अनिल शिदोरे (Anil Shidore), बाबू वागस्कर (Babu Wagaskar) आणि बाळा शेडगे (Bala Shedge) बैठकीला उपस्थित होते.

 

 

त्यावेळी मला माहिती नव्हते
कोथरुडमध्ये एका कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने विचारले की, सुरुवातीला तुम्हीच मोदी (Narendra Modi) यांना मोठे केले.
त्यांच्यामागे उभे राहिलात. त्यावेळी राज ठाकरे म्हणाले, मला त्यावेळी माहिती नव्हते, ते असे निघतील, असे वाटले नव्हते.
चांगले काम करीत आहेत, असे वाटल्याने मी पाठिंबा दिला होता.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

Web Title :- BJP-MNS Alliance | no alliance with bjp in pune municipal elections says MNS Chief raj thackeray

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मित्र पत्नीसोबत ‘मज्जा’ मारायचे अन् पतीला मिळायचं ‘सुख’ आणि मिळायचा ‘आनंद’, पुण्याच्या बारामतीमधील धक्कादायक घटना; जाणून घ्या भयावह स्टोरी

Oblique Lines On Indian Notes | 100, 200, 500 आणि 2000 च्या नोटांवर रेषा का छापलेल्या असतात? जाणून घ्या काय असतो अर्थ आणि का आहे आवश्यक

Nora Fatehi Oops Moment | नोरा फतेही झाली Oops Moment ची शिकार, बोल्ड ड्रेस घालणं पडलं महागात (व्हिडीओ)

 

Related Posts