IMPIMP

BJP on Shivsena | भाजपचं शिवसेनेला आव्हान; म्हणाले – ‘हिंदुत्वाची बॅनरबाजी कसली करता, औवेसींवर गुन्हा दाखल करा’

by nagesh
BJP on Shivsena | file a case against owaisi bjps challenge to shiv sena

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन BJP on Shivsena | एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी (MIM Leader Akbaruddin Owaisi) यांच्यासह काल (गुरूवारी) इतर पदाधिकाऱ्यांनी औरंगाबादेमध्ये औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले. यावरुन आता राज्यातील राजकीय वातावरण तापलं असल्याचं दिसत आहे. यानंतर भाजप (BJP), शिवसेना (Shivsena) तसेच मनसे (MNS) पक्षाकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut), भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ओवेसींवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यानंतर आता भाजप नेते मोहित कंबोज (BJP Leader Mohit Kamboj) यांनीही शिवसेनेला कोंडीत पकडत ”तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला सांगा 15 मिनिटांत औवेसीला उत्तर देऊ,” असं ते म्हणाले. (BJP on Shivsena)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

”ओवेसी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेऊन महाराष्ट्रात चिथावणीखोर भाषण करतो. शेरगिल उस्मानी हिंदूंवर टिप्पणी करतो. त्यांच्यावर कारवाई होत नाही. परंतु हनुमान चालीसा लावू म्हणणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात. राजद्रोहाची कलमे लावली जातात. एक हजार मस्जिदींवर भोंगे लावण्याची परवानगी दिली. वाह रे वाह ठाकरे सरकार (Thackeray Government),” असा टोला मोहित कंबोज यांनी लगावला आहे. (BJP on Shivsena)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

पुढे मोहित कंबोज म्हणाले, ”ठाकरे सरकार सत्तेसाठी लाचार झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात एक कुत्रा येतो आणि औरंगजेबाच्या समाधीचं दर्शन घेऊन हिंदुना जाहिरपणे ललकारतो. त्यावर कसलीही कारवाई होत नाही, कसलाही गुन्हा दाखल होत नाही. एकीकडे हनुमान चालिसा पठण केलं तर गुन्हे दाखल होतात. खुर्चीसाठी विचारधारा सोडली बाळासाहेबांचं हिंदुत्व सोडलं आणि मुंबई शहरात सगळीकडे हिंदुत्वाची बॅनरबाजी कसली करता? तुमच्याकडून होत नसेल तर आम्हाला सांगा 15 मिनिटांत ओवैसीला उत्तर देऊ,” असा इशारा त्यांनी दिला.

Web Title :- BJP on Shivsena | file a case against owaisi bjps challenge to shiv sena

हे देखील वाचा :

Balgandharva Rang Mandir Pune | ‘सर्वांना विश्वासात घेऊनच ‘बालगंधर्व’ पुनर्विकासाचा निर्णय’ ! पुनर्विकासाचे काम विक्रमी वेगाने पूर्ण करणार; माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती

MNS Chief Raj Thackeray | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सुरक्षेत वाढ

Split Pigeon Peas For Diabetes | डायबिटीज कमी करण्यात लाभदायक आहे तुरळीची डाळ, जाणून घ्या 5 मोठे फायदे

Related Posts