IMPIMP

Body Detoxification Food | बॉडी डिटॉक्स करतो गुळ, जाणून घ्या आरोग्यासाठी कशाप्रकारे लाभदायक

by nagesh
Body Detoxification Food | jaggery can detox your body know its other health and nutrition benefits

सरकारसत्ता ऑनलाइन  टीम – Body Detoxification Food | गूळ (Jaggery) हा आपल्या जेवणाचा एक महत्त्वाचा भाग आहे. अनेकदा आपण काही खाल्ल्यानंतर तोंड गोड करण्यासाठी तो खातो. गुळाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले प्रोटीन, व्हिटॅमिन बी12, कॅल्शियम आणि आयर्नसारखे पोषक घटक चांगल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. गुळामध्ये फॅटचे प्रमाण खूपच कमी असते, त्यामुळे वजन कमी करण्यातही तो गुणकारी आहे. (Body Detoxification Food)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

दिवसातून एकदा गूळ (Jaggery) खाल्ल्याने शरीर डिटॉक्स होते. जेवणानंतर गुळाचे सेवन केल्याने शरीरातील पाचक एंजाइम बाहेर पडण्यास मदत होते. ज्या लोकांची पचनशक्ती खराब आहे, त्यांनी जेवणानंतर नियमितपणे गुळाचे सेवन करावे. गुळामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि पचनक्रिया सुधारते. (Body Detoxification Food)

 

हिवाळ्यात उष्ण गुळाचे सेवन आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. गुळाच्या सेवनाने आरोग्याला कोणते फायदे होतात ते जाणून घेवूयात…

 

1. लिव्हर स्वच्छ करतो :
गुळाचा छोटा तुकडा खाल्ल्यानंतर लिव्हर (Liver) स्वच्छ होते. गूळ खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत राहून शरीराला पूर्ण पोषण मिळाल्याने शरीर निरोगी राहते.

 

2. त्वचा चमकदार होते :
गूळ खाल्ल्याने शरीराचे आरोग्य तर चांगले राहतेच शिवाय त्वचाही चमकदार होते. गुळातील आयर्न आणि फोलेट अ‍ॅसिड शरीरात पोहोचतात आणि त्वचेच्या पेशींमध्ये रक्ताभिसरण वाढवतात, त्यामुळे त्वचा (Skin) सुधारते. याचे सेवन केल्याने तुम्ही तरुण आणि सुंदर दिसता.

 

3. बद्धकोष्ठता दूर होते :
ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी गुळाचे सेवन करावे. गूळ पाचक एंझाइम सक्रिय करतो, ज्यामुळे बद्धकोष्ठता (Constipation) दूर होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

4. चयापचय वाढते :
गूळ हा एक नैसर्गिक शरीर शुद्ध करणारा पदार्थमानला जातो. जेवणानंतर दररोज गुळ सेवन केल्यास तुमचे आरोग्य सुधारते. गूळ चयापचय वाढवतो. चयापचय जितके जास्त वाढेल तितक्या वेगाने तुमचे वजन कमी होईल. गुळातील पोटॅशियम चयापचय सुधारते. (Body Detoxification Food)

 

5. अ‍ॅनिमियावर उपचार करतो :
गूळ हा आयर्नचा उत्कृष्ट स्रोत आहे जो शरीरातील अशक्तपणावर उपचार करतो. रक्ताची कमतरता पूर्ण करण्यासाठी, खाल्ल्यानंतर गुळाचा तुकडा सेवन करा. यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन खूप वेगाने वाढेल आणि अशक्तपणा टाळता येईल.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Body Detoxification Food | jaggery can detox your body know its other health and nutrition benefits

 

हे देखील वाचा :

Eknath Khadse | एकनाथ खडसेंच्या भाजप घरवापसीच्या चर्चांना उधाण ! खडसे फडणवीसांचे नाव घेत म्हणाले – ‘हे जेव्हा गोधडीत…’

Eknath Khadse | खडसे-अमित शहा भेटीवर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण, ही भेट घेण्यापूर्वी…

LIC च्या या प्लानमध्ये रोज 73 रुपये जमा करून मॅच्युरिटीवर मिळवा पूर्ण 10 लाख रुपये, जाणून घ्या डिटेल्स

 

Related Posts