IMPIMP

Eknath Khadse | एकनाथ खडसेंच्या भाजप घरवापसीच्या चर्चांना उधाण ! खडसे फडणवीसांचे नाव घेत म्हणाले – ‘हे जेव्हा गोधडीत…’

by nagesh
Eknath Khadse | Finally, a case of embezzlement of Jalgaon district milk union was registered; Eknath Khadse's big allegations against the police

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन  –  भाजपमधून राष्ट्रावादी काँग्रेस (NCP) पक्षात गेलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे पुन्हा भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. भाजप प्रवेशाच्या चर्चांना एकनाथ खडसे यांनीच पूर्णविराम दिला आहे. जळगावचे आमदार चंद्रकांत पाटील (Jalgaon MLA Chandrakant Patil) यांनी काही दिवसांपूर्वी खडसे (Eknath Khadse) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांची भेट घेतल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर खडसे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली. मात्र, या भेटीसंदर्भात आता एकनाथ खडसे यांच्या कन्या तसेच भाजपच्या खासदार रक्षा खडसे (BJP MP Raksha Khadse) यांनी उत्तर दिलं आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अमित शहांना भेटण्यासाठी गेल्याची माहिती खरी असल्याचे सांगताना अमित शाह आणि नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबरोबर आपले मागील अनेक वर्षापासून चांगले वैयक्तीक संबंध आसल्याचे खडसे यांनी सांगितले. अमित शहांना एकदा भेटलो नाही याआधी पण भेटलो आहे. देवेंद्रजींनाही (Devendra Fadnavis) भेटलो आहे आणि या पुढेही भेटणार आहे. शहांना भेटू नये असा नियम आहे. हे जेव्हा गोधडीत होते तेव्हापासून माझे संबंध आहेत, असे खडसे यांनी सांगितलं.

 

एकाच घरामध्ये दोन पद आहे, हे काही आमच्याच घरात नाही. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या घरात 30 वर्षापासून साधनाताई (Sadhana Mahajan) जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. आता नगराध्यक्ष आहेत. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा मुलगा हा जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. एका घरामध्ये अनेक जण असतातच. राजकारणामध्ये ज्याच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता असते, ते निवडून येतात, ज्यांच्यामध्ये क्षमता नसते जनता त्याला पराभूत करते असंही खडसे म्हणाले.

 

आम्ही दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला गेलो होतो. पण, अमित शाह यांची भेट होऊ शकली नाही.
पण एकनाथ खडसे यांची फोनवरुन अमित शाह यांच्यासोबत चर्चा झाली आहे,
अशी माहिती खुद्द भाजप खासदार रक्षा खडसे (BJP MP Raksha Khadse) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
तसेच खडसे भाजपमध्ये जाणार का, असे विचारले असता रक्षा खडसे म्हणाल्या,
लोकांना चर्चा करायची ते करणार ते भाजपमध्ये येण्याची कल्पना नाही.
मी भाजपमध्ये आहे ते राष्ट्रवादीत आहेत, असे रक्षा खडसे यांनी सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Eknath Khadse | eknath khadse on meeting amit saha and returning to bjp

 

हे देखील वाचा :

Eknath Khadse | खडसे-अमित शहा भेटीवर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण, ही भेट घेण्यापूर्वी…

LIC च्या या प्लानमध्ये रोज 73 रुपये जमा करून मॅच्युरिटीवर मिळवा पूर्ण 10 लाख रुपये, जाणून घ्या डिटेल्स

Uric Acid Control Tips | वाढत्या यूरिक अ‍ॅसिडने असाल त्रस्त तर सकाळी रिकाम्या पोटी करा लिंबूचे सेवन, जाणून घ्या पद्धत आणि फायदे

 

Related Posts