IMPIMP

Bombay HC Summons To Bill Gates | बिल गेट्स यांना मुंबई हायकोर्टाने बजावले समन्स, याचिकाकर्त्याने मागितली 1000 कोटीची नुकसान भरपाई

by nagesh
Bombay HC Summons To Bill Gates | bill gates serum institute get bombay high court notice over alleged vaccine death

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Bombay HC Summons To Bill Gates | मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) शुक्रवारी कोविशील्ड व्हॅक्सीन (Covishield vaccine) बनवणारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India) आणि मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांना नोटीस पाठवली. याचिकाकर्ते दिलीप लुणावत यांच्या याचिकेवर न्यायालयाने दोघांकडून उत्तर मागवले आहे. लुणावत यांनी आपल्या याचिकेत आरोप केला आहे की, कोरोना लस कोविशील्डच्या साईड इफेक्टमुळे त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. त्यांनी 1000 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. (Bombay HC Summons To Bill Gates)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

2020 मध्ये, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनसोबत (Melinda Gates Foundation) भागीदारी केली होती.
ही भागीदारी कोरोना लसीच्या (Corona vaccine) उत्पादनाला गती देण्यासाठी करण्यात आली होती,
जेणेकरून भारत आणि कमी उत्पन्न असलेल्या देशांना कोविशील्ड कोरोना व्हॅक्सीनचे 10 कोटी डोस पुरवता येऊ शकतात. (Bombay HC Summons To Bill Gates)

 

या याचिकेत लुनावत Dilip Lunawat यांनी भारत सरकार, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारताचे औषध नियंत्रक महासंचालक डॉ. व्ही.जी. सोमाणी (Dr. V.G. Somani) आणि एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Dr. Randeep Guleria – AIIMS) यांना वादी केले आहे.
या याचिकेवर मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) सर्वांकडून उत्तरे मागवली आहेत.

 

औरंगाबादचे दिलीप लुणावत (Dilip Lunawat – Aurangabad) यांनी न्यायालयाला सांगितले की, त्यांची मुलगी डॉक्टर होती.
ती धामणगावच्या एमएमबीटी डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये सिनियर लेक्चरर होती.
मेडिकल कॉलेजमध्ये (Medical College) जेव्हा सर्व आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना व्हॅक्सीन घेण्यास सांगितल्यावर त्यांच्या मुलीलाही ती घ्यावी लागली होती.

 

लुणावत यांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलीला खात्री देण्यात आली की लस पूर्णपणे सुरक्षित असून तिच्या शरीरावर कोणताही परिणाम होणार नाही.
डॉ. सोमाणी आणि डॉ. गुलेरिया यांनीही लसीच्या सुरक्षिततेबद्दल अनेक मुलाखती दिल्या.
त्यांनी आपल्या मुलीचे जानेवारी 2021 चे कोरोना व्हॅक्सीनचे सर्टिफिकेटही (Corona vaccine certificate) न्यायालयात सादर केले आहे.
कोविशील्ड व्हॅक्सीनच्या साईड इफेक्टमुळे 1 मार्च 2021 रोजी त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला.
केंद्र सरकारच्या स्वत:च्या 2 ऑक्टोबर 2021 च्या AEFI रिपोर्टमध्ये कोरोना व्हॅक्सीनच्या साईड इफेक्टचे (Corona vaccine side effects) दुष्परिणाम सूचित केले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title : –  Bombay HC Summons To Bill Gates | bill gates serum institute get bombay high court notice over alleged vaccine death

 

हे देखील वाचा :

Maternity Leave | मोदी सरकारचा निर्णय ! जन्मानंतर बाळाचा मृत्यू झाल्यास महिला कर्मचार्‍याला 60 दिवसांच्या सुट्टीचा अधिकार

Pune Crime | पिंपरी व पुणे महापालिकेची फसवणुक ! महेश धूत, निंबाळकर, कर्‍हे, मिसाळ, कोळपे, अल्हाट, सोनवणे, साळवे, कदम, पाटील, सिध्दनाथ डेव्हलपर्स तर्फे जहाँगिर हूसेन मुल्ला, साई स्वराज डेव्हलपर्सचे पोपट पायगुडे, हेमचंद्र भाटी, समीर कडु, मे. सातव पाटील एंटरप्रायसेसचे निखील सातव यांच्याविरूध्द हडपसर पोलिस ठाण्यात FIR

Ajit Pawar On Shivsena Dussehra Melawa | दसरा मेळावा वादात अजित पवारांची उडी; दोन्ही गटाला सुनावलं

 

Related Posts