IMPIMP

BP Control Tips | ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी ‘हे’ 5 नैसर्गिक उपाय अवलंबा

by nagesh
BP Control Tips | natural and effective ways to control high blood pressure

सरकारसत्ता ऑनलाइन – BP Control Tips | हाय ब्लड प्रेशर (High Blood Pressure) किंवा उच्च रक्तदाब हा एक आजार आहे जो खराब जीवनशैली, तणाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे विकसित होतो. सायलेंट किलर (Silent Killer) म्हणून ओळखल्या जाणार्‍या या आजाराने लाखो लोकांना प्रभावित केले आहे. उच्च रक्तदाब ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रक्तदाब धोकादायक पातळीपर्यंत वाढतो, ज्यामुळे कालांतराने हृदयाला (Heart) हानी पोहोचते. यामुळे स्ट्रोक (Stroke) आणि हृदयविकाराचा झटका (Heart Attack) देखील येऊ शकतो (BP Control Tips).

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

जेव्हा उच्च रक्तदाबाच्या रुग्णांचे बीपी (BP) वाढते तेव्हा रुग्णाला तीव्र डोकेदुखी, छातीत दुखणे, धाप लागणे, गोंधळ आणि त्वचेवर लाल पुरळ यांसारखी लक्षणे दिसू लागतात. उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी (BP Control Tips) शारीरिकदृष्ट्या सक्रिय असणे आवश्यक आहे, तसेच आहाराकडे (Diet) विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.

 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, जगभरात अंदाजे 1.13 अब्ज लोक उच्च रक्तदाबाने (High BP) ग्रस्त आहेत. 2015 मध्ये 5 पैकी 1 महिला आणि 4 पैकी 1 पुरुषाला उच्च रक्तदाब होता. 2020 च्या पुनरावलोकनाने असा निष्कर्ष काढला आहे की उच्च रक्तदाब हा जगभरातील हृदयरोग आणि अकाली मृत्यूसाठी प्रमुख जोखीम घटक आहे.

 

रक्तदाब नियंत्रित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. औषधाव्यतिरिक्त, त्यावर नियंत्रण ठेवण्याचे अनेक मार्ग आहेत. नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करून तुम्ही रक्तदाब नियंत्रित करू शकता.

रक्तदाब नियंत्रित ठेवण्याचे 5 प्रभावी मार्ग

1. सोडियमचे (Sodium) सेवन कमी करा :
उच्च रक्तदाब आणि सोडियम यांच्यात मोठा संबंध असल्याचे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. सोडियम स्ट्रोकचे कारण ठरू शकतो. सोडियमचे सेवन कमी केल्याने उच्च रक्तदाब 5 ते 6 mm Hg कमी होऊ शकतो. सामान्य व्यक्तींनी एका दिवसात 2,300 मिलीग्रामपेक्षा जास्त मीठ खाऊ नये.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

2. पोटॅशियमचे (Potassium) सेवन वाढवा :
उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांसाठी पोटॅशियम हे एक आवश्यक पोषकतत्व आहे. हे खनिज अतिरिक्त सोडियमपासून मुक्त (Sodium Free) होण्यास मदत करते आणि रक्तवाहिन्यांवरील दबाव कमी करते. हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, बटाटे, आणि रताळे, खरबूज, केळी, एवोकॅडो, संत्री आणि जर्दाळू, नट आणि बिया, दूध, दही, टयूना यांसारखे पोटॅशियम समृद्ध पदार्थ खा.

 

3. नियमित व्यायाम करा (Exercise Regularly) :
अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की प्रत्येक व्यक्तीने निरोगी राहण्यासाठी आणि जुनाट आजारांचा धोका कमी करण्यासाठी 30 ते 45 मिनिटे नियमित व्यायाम (Exercise) केला पाहिजे. उच्च रक्तदाबाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या सर्व लोकांसाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. नियमित व्यायामामुळे तुमचे हृदय मजबूत होते आणि ते रक्त पंप करण्यास मदत करते, तसेच रक्तवाहिन्यांवरील (Blood Vessels) दबाव कमी होतो. चांगल्या आरोग्यासाठी (Health) दिवसातून 40 मिनिटे चालणे पुरेसे आहे.

 

4. सिगारेट (Cigarettes) आणि अल्कोहोल (Alcohol) टाळा :
सिगारेट आणि अल्कोहोल दोन्ही उच्च रक्तदाब वाढवण्यास मदत करतात. अनेक संशोधने असे सुचवतात की अल्कोहोलमुळे जगभरातील उच्च रक्तदाब वाढतो. अल्कोहोल आणि निकोटीन (Nicotine) दोन्ही रक्तदाब वाढवू शकतात आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान करू शकतात.

 

5. रिफाईंड कार्बोहायड्रेट्सचे (Refined Carbohydrates) सेवन कमी करा :
ब्रेड (Bread) आणि साखर (Sugar) यांसारखे पदार्थ तुमच्या ब्लड शुगरमध्ये झपाट्याने परावर्तीत होतात
आणि त्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. मैद्याऐवजी धान्य घ्या. साखरेऐवजी गूळ किंवा मध वापरा.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रक्तदाब कमी करण्यासाठी हे उपाय करा

वजन नियंत्रणात ठेवा.

वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवा.

अल्कोहोलचे सेवन कमी करा. यामुळे रक्तदाब 2-4 mm Hg ने कमी होतो.

योगासने, प्राणायाम यासारखे व्यायाम नियमितपणे करा.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

# lifestyle # health # BLOOD PRESSURE # LIFESTYLE # AVOID ALCOHOL # HIGH RISK OF BP # BP CONTROL TIPS # हाय ब्लडप्रेशर # Lifestyle and Relationship # Health and Medicine # उच्च रक्तदाब # उच्च रक्तदाब नियंत्रण # उच्च रक्तदाब # कंट्रोल

 

Web Title :- BP Control Tips | natural and effective ways to control high blood pressure

 

हे देखील वाचा :

Tata Group | टाटा ग्रुपच्या ‘या’ कंपनीने केले ‘कंगाल’, सातत्याने लागत आहे लोअर सर्किट

Post Office Transaction Rules | पोस्ट ऑफिसमध्ये 20 हजार रुपयांपेक्षा जास्त ट्रांजक्शनसाठी द्यावी लागतील ‘ही’ कागदपत्रं, जाणून घ्या सविस्तर

Eggs Health Benefits | चाळीशीनंतर अंडे खाणे आरोग्यासाठी योग्य आहे का? जाणून घ्या सविस्तर

 

Related Posts