IMPIMP

Breathe Into the Shadow | ‘या’ कारणामुळे जया बच्चन अभिषेकची ‘ब्रीथ 2’ सीरिज पाहणार नाही

by nagesh
  Breathe Into the Shadow | abhishek bachchan reveals mother jaya hates watching violence aggression prefers parliament over it

सरकारसत्ता ऑनलाईन  – अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), नित्या मेनन (Nithya Menen), सैय्यामी खेर (Saiyami Kher) आणि अमित साध (Amit Sadh) यांची महत्त्वाची भूमिका असलेली ‘ब्रीथ- इन्टू द शॅडो’ (Breathe Into the Shadow) या वेब सीरिजने चाहत्यांच्या मनात सध्या घर केले होते. आता या सिरीजचा नवा सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पहिल्या सीजनमध्ये अभिषेकने साकारलेल्या भूमिकेमुळे त्याचबरोबर त्याच्या अभिनय कौशल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात होते. आता या सिरीजचा (Breathe Into the Shadow) नवा सिजन येत्या ९ नोव्हेंबर पासून ॲमेझॉन प्राईम (Amazon Prime) व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ट्रिम होणार आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अभिषेकला एका मुलाखतीमध्ये या सिरीज बाबत घरातील व्यक्तींची मते विचारली असता तो म्हणाला, “भाची नव्या नवेली नंदाला (Navya Naveli Nanda) डार्क थ्रिलर कथा पाहायला खूप आवडतात. तर वडील अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे नेहमीच माझ्या कामाचे कौतुक करत असतात. माझी आई जया बच्चन (Jaya Bachchan) ही सिरीज पाहणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट सांगितले”. त्याच्या या उत्तराने सर्वच आश्चर्यचकित झाले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तर जया बच्चन या त्याचा सिरीज (Breathe Into the Shadow) का पाहणार नाही यावर बोलताना
अभिषेक म्हणाला, “माझ्या आईला अशा कथेंची भीती वाटते. यावरून एवढे मात्र नक्की सांगेन की आम्ही
चांगली थ्रिलर सिरीज बनवली आहे. माझ्या कुटुंबातील सर्वजण आदल्या रात्रीपासूनच या सिरीजची आतुरतेने
वाट पाहत असतात. मात्र माझ्या आईला अशा प्रकारची हिंसा संतापाची भावना असलेले पाहायला आवडत नाही.
कदाचित म्हणूनच त्या संसदेत (Parliament) निघून जात असाव्या ज्या ठिकाणी अशा गोष्टी घडत नाहीत”.
असे मजेशीर उत्तरही अभिषेकने यावेळी दिले.

 

 

Web Title :-  Breathe Into the Shadow | abhishek bachchan reveals mother jaya hates watching violence aggression prefers parliament over it

 

हे देखील वाचा :

MS Dhoni | IPS अधिकाऱ्याच्या विरोधात महेंद्रसिंग धोनीची याचिका, काय आहे संपूर्ण प्रकरण

Gulabrao Patil | ‘… तर राष्ट्रवादी भाजपसोबत गेली असती’, गुलाबराव पाटील यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Indian Society of Digital Dentistry | प्रगत दंतवैद्यक उपचार लोकाभिमुख करण्यासाठी इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेन्टिस्ट्रीची स्थापना

 

Related Posts