IMPIMP

Shivsena Chief Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंकडून भुजबळांचे कौतुक, भुजबळ शिवसेनेत असते तर आधीच मुख्यमंत्री झाले असते

by nagesh
Shivsena Chief  Uddhav Thackeray | mumbai shivsena uddhav thackeray on ncp chhagan bhujbal 75 th birthday and maharashtra political crisisShivsena Chief  Uddhav Thackeray | mumbai shivsena uddhav thackeray on ncp chhagan bhujbal 75 th birthday and maharashtra political crisis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन आज राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी भुजबळ यांचे तोंडभरून कौतूक केले. ठाकरे म्हणाले, छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली त्यावेळी आम्हाला मोठा धक्का बसला होता, त्यातून सावरायला खूप वेळ लागला, पण भुजबळ जर शिवसेनेत असते तर आधीच मुख्यमंत्री झाले असते. भुजबळांचे कौतुक मी करण्याची आवश्यकता नाही, नाहीतर तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने जमलाच नसता, असे उद्धव ठाकरे (Shivsena Chief  Uddhav Thackeray) यांनी म्हटले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) म्हणाले, चार महिने अजून सत्ता असती तर छगन भुजबळ हे मुख्यमंत्री झाले असते असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, पण मी सांगतो की छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली नसती तर ते या आधीच मुख्यमंत्री झाले असते. भुजबळांनी शिवसेना सोडली हा आमच्यासाठी सर्वात मोठा धक्का होता. त्यामुळे आम्हाला सावरायला खूप वेळ लागला. एक चांगली गोष्ट भुजबळांनी केली ती म्हणजे बाळासाहेब (Balasaheb Thackeray) असतानाच त्यांनी हे मतभेद मिटवले. त्यावेळी माँ असत्या तर अजून चांगले झाले असते.

 

ठाकरे पुढे म्हणाले, भुजबळांनी शिवसेना सोडली त्यावेळी ते एकटे गेले, आता परत येताना त्यांनी काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीलाही सोबत आणले.
छगन भुजबळ यांच्या राजकीय मुत्सद्देगिरीबद्दल अजित पवार यांनी आताच सांगितले.
हे मला आधीच सांगितले असते तर शिवसेना फुटताना मी त्यांना जबाबदारी दिली असती आणि सरकारही वाचले असते.

 

या कार्यक्रमात विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, महाराष्ट्र सदन (Maharashtra Sadan) बांधण्यात महाराष्ट्र सरकारने एक रुपया देखील खर्च केला नाही.
तरी देखील छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले, त्यांची बदनामी केली.
छगन भुजबळ ठोशास ठोसा द्यायचे चांगले जाणतात. ज्यावेळी शिवसेनेचे 15 आमदार गेले त्यावेळी उद्धव ठाकरे
यांनी आमदारांना परत आणायची जबाबदारी भुजबळांना दिली असते तर ते सगळ्यांना माघारी घेऊन आले
असते आणि आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Shivsena Chief  Uddhav Thackeray | mumbai shivsena uddhav thackeray on ncp chhagan bhujbal 75 th birthday and maharashtra political crisis

 

हे देखील वाचा :

Chagan Bhujbal | तुमच्याकडे एवढा पैसा आला कुठून? छगन भुजबळांनी दिले उत्तर, म्हणाले…

Pune Crime | पीएमपीएल बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, बसचालकाविरुद्ध FIR

Jalgaon Crime | गोलाणी मार्केटजवळील हायप्रोफाईल ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 9 जणांना घेतले ताब्यात

 

Related Posts