IMPIMP

Gopichand Padalkar | ‘उद्धव ठाकरे-राष्ट्रवादीचे विलिनिकरण करा अन्..’ पडळकरांनी सांगितले चिन्ह

by nagesh
Gopichand Padalkar | 'Merge Uddhav Thackeray-Nationalists and..' Padalkar said the sign

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – जून महिन्यात शिवसेनेत (Shivsena) मोठे बंड झाल्याने गेले चार महिने महाराष्ट्रात सत्तेचा आणि राजकारणाचा नवा अंक रंगला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर शिवसेनेला मोठ्या विद्रोहाला सामोरे जावे लागत आहे. एकनाथ शिंदे यांना भाजपचा (BJP) मोठा पाठिंबा आहे, तर शिवसेनेला महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) पाठिंबा आहे. त्यामुळे राज्यात सध्या काँग्रेस (Congress), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे आणि भाजप असा शाब्दिक समर सुरु आहे. आता भाजपचे आमदार गोपिचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर मोठी टीका केली आहे. राष्ट्रवादीने शिवसेना संपविल्याचा आरोप गोपिचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) केला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

एक राजा असतो, त्याचा हात कोणत्याही वस्तूला लागला की त्याचे सोने होते, अशी एक कथा मी ऐकली होती. पण बारामतीचा जाणता राजा शरद पवार यांचा हात कोणत्याही गोष्टीला लागला की त्याची राख होते, असे पडळकर म्हणाले. आता शिवसेनेची राख झाली आहे. भाजप आणि शिवसेनेत अंतर आणण्याचे मी बरेच प्रयत्न केले, असे शरद पवार म्हणाले होते, असा दावा पडळकरांनी (Gopichand Padalkar) केला.

 

शिवसेनेला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकत्र करुन त्यांना खंजीर चिन्ह द्यायला पाहिजे.
उद्धव ठाकरेंना मशाल जनमाणसांत रुजवायला वेळ लागेल.
पण खंजीर म्हंटल्यावर लगेच लोकांच्या लक्षात आले असते.
त्यामुळे राष्ट्रवादीचे चिन्ह गोठवून शिवसेना आणि राष्ट्रवादीला खंजीर चिन्ह द्या, असे मी निवडणूक आयोगाला लिहिणार असल्याचे पडळकर म्हणाले.

 

 

Web Title – Gopichand Padalkar | ‘Merge Uddhav Thackeray-Nationalists and..’ Padalkar said the sign

 

हे देखील वाचा :

Shivsena Chief Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंकडून भुजबळांचे कौतुक, भुजबळ शिवसेनेत असते तर आधीच मुख्यमंत्री झाले असते

Chagan Bhujbal | तुमच्याकडे एवढा पैसा आला कुठून? छगन भुजबळांनी दिले उत्तर, म्हणाले…

Pune Crime | पीएमपीएल बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, बसचालकाविरुद्ध FIR

Jalgaon Crime | गोलाणी मार्केटजवळील हायप्रोफाईल ‘सेक्स’ रॅकेटचा पर्दाफाश, 9 जणांना घेतले ताब्यात

 

Related Posts