IMPIMP

Budget-2022 | विकासाच्या वाटेवर नेणारा सकारात्मक अर्थसंकल्प, कर सल्लागार, सनदी लेखापालांची भावना

by nagesh
Budget-2022 | The spirit of a positive budget, a tax advisor, a chartered accountant

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनBudget-2022 | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी सादर केलेला अर्थसंकल्प (Budget-2022) हा विकासाच्या वाटेवर नेणारा, पायाभूत सुविधा उभारणीला चालना देणारा आणि डिजिटलायझेशनच्या (Digitization) माध्यमातून भ्रष्टाचाराला (Corruption) चाप लावणारा असा सकारात्मक, चांगला आणि समतोल असल्याची भावना कर सल्लागार (Tax Advisor), सनदी लेखापाल (Chartered Accountant), वकिल (Lawyer) यांनी व्यक्त केली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

सर्वार्थाने महत्वपूर्ण असलेल्या या अर्थसंकल्पाचे (Budget-2022) विश्लेषण करण्यासाठी आणि लाईव्ह अर्थसंकल्प ऐकण्यासाठी महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशन (Maharashtra Tax Practitioners Association) व देशभरातील इतर महत्वाच्या कर सल्लागार संघटनांच्या वतीने शिवाजी रस्त्यावरील महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या (MTPA) सभागृहात विशेष सत्राचे आयोजन केले होते. ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने 500 हुन अधिक कर सल्लागार, सनदी लेखापाल सहभागी झाले होते.

‘एमटीपीए’चे अध्यक्ष मनोज चितळीकर (Manoj Chitlikar), माजी अध्यक्ष नरेंद्र सोनावणे (Narendra Sonawane), प्रकाश पटवर्धन, शरद सूर्यवंशी, व्ही. एन. जोशी, ए. एम. मुजुमदार, संतोष शर्मा, विधिज्ञ मिलिंद भोंडे, सीए ऋता चितळे (CA Rita Chitale), सीए अलोक मेहरा (CA Alok Mehra), ‘एमटीपीए’चे पदाधिकारी श्रीपाद बेदरकर, स्वप्नील शहा, अनुरुद्र चव्हाण, अॅड. प्रणव शेठ आदी उपस्थित होते. विदर्भ, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आदी ठिकाणाहून कर सल्लागार सहभागी झाले होते.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मनोज चितळीकर म्हणाले, हा अर्थसंकल्प देशाला विकासाकडे नेणारा आहे. शेती क्षेत्रात 2.37 लाख कोटींची तरतूद ही आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वांत मोठी तरतूद आहे. शेतकऱ्यांना समर्पित (Dedicated to Farmers) करणारा हा अर्थसंकल्प असून शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. टेक्नोलॉजीचा (Technology) उपयोग करून शेतकऱ्यांना मार्केट एक्सेस (Market Access) मिळण्यास मदत होईल. 60 लाख रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट भविष्यातील भारतासाठी उपयुक्त ठरेल.

नरेंद्र सोनवणे म्हणाले, लघु व माध्यम उद्योग, कृषी क्षेत्रासह शिक्षण आणि संशोधन यासाठी भरीव तरतूद केली आहे. सौरऊर्जा (Solar Energy), इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles), स्टार्टअपला चालना देण्याचा प्रयत्न यातून झाला आहे. करदात्यांसाठी मात्र विशेष काही केल्याचे दिसत नाही. जीएसटी (GST) परताव्यातील अपेक्षित बदल झालेले नाहीत. कोरडवाहू आणि बागायती शेतीसाठीही चांगली तरतूद केल्याचे दिसते. तसेच शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार असल्याने, तसेच शेतीसंबंधी कागदपत्रांचे डिजिटलायझेशन होणार असल्याने शेतकऱ्यांच्या प्रगतीला चालना मिळेल.

 

 

विधिज्ञ अॅड. मिलिंद भोंडे (Lawyer Adv. Milind Bhode) म्हणाले, पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे.
सर्वच सामाजिक घटकांचा अंतर्भाव असलेला हा अर्थसंकल्प आहे.
पायाभूत सुविधांच्या उभारणीवर भर देतानाच अर्थव्यवस्थेतील तूट कमी करण्यावरही लक्ष दिले आहे.
विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी स्वतंत्र चॅनेल सुरु होणार असून, डिजिटल शिक्षण (Digital Learning) घेता येणार आहे.
त्यामुळे वर्क फ्रॉम होम (Work From Home) प्रमाणे आता स्कुल फ्रॉम होम (School From Home) ही संकल्पना रुजू शकेल.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विभागीय समिती सदस्य, आयसीएआयसीए ऋता चितळे म्हणाल्या, युवक, कृषी आणि लघु व माध्यम उद्योगांच्या विकासावर भर दिला आहे.
पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाचा अंतर्भाव आणि महिलांचे सक्षमीकरण यासाठी भरीव तरतूद दिसते.
कोरोनाच्या (Corona) महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी महत्वाची पावले उचलली आहेत.
करदात्यांच्या पदरी निराशा असली, तरी एकंदरीत समतोल साधणारा अर्थसंकल्प सीतारामन यांनी सादर केला आहे.

 

एमटीपीए माजी अध्यक्ष प्रकाश पटवर्धन म्हणाले, चांगल्या रीतीने अर्थसंकल्प मांडला आहे.
‘बोल्ड अँड ब्युटीफुल’ असे याचे वर्णन करता येईल.
जीएसटी संकलनाच्या बाबतीत जाचक तरतुदी आणि अनावश्यक दंड यामुळे वाढ झाल्याचे दिसते आहे.
त्यामुळे मधुसंचय आणि शोषण यातील फरक समजून घ्यायला हवा.
क्रिप्टो करन्सी (Cryptocurrency) परदेशात शिक्षण, व्यवसाय करण्यासाठी उपयुक्त आहे. त्यावरही भर दिला आहे.

 

Web Title :- Budget-2022 | The spirit of a positive budget, a tax advisor, a chartered accountant

 

हे देखील वाचा :

Egg Freezing | प्रेग्नंट होण्यासाठी कशी केली जाते प्रक्रिया, जाणून घ्या याबाबत सविस्तर

Former MLA Mohan Joshi | महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा विजय मिळेल – माजी आमदार मोहन जोशी

Pune Vyapari Mahasangh | व्यापाऱ्यांसाठी निराशाजनक अर्थसंकल्प, पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया यांची प्रतिक्रिया

Casting Couch | अंकिता लोखंडेपासून तर दिव्यांका त्रिपाठीपर्यंत ‘या’ 6 अभिनेत्र्या झाल्यात कास्टिंग काऊचच्या शिकार; जाणून घ्या त्यांचे अनुभव

 

Related Posts