IMPIMP

Budget 2023 | मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…

by nagesh
Devendra Fadnavis | The country's economy will rank third in the world - Deputy Chief Minister Devendra Fadnavis

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  आज संसदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी केंद्र सरकारचा अर्थसंकल्प (Budget 2023) सादर केला. या अर्थसंकल्पाकडे सर्व देशाचे लक्ष लागून राहिले होते. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममधील हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने यातून मध्यमवर्गीयांसाठी काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. विरोधकांनी मोदी सरकारच्या या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. मात्र, त्याचवेळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हा अर्थसंकल्प हा अमृत काळातील सर्वजन हिताय, या संकल्पनेवर आधारित अशाप्रकाराचा अर्थसंकल्प (Budget 2023) आहे. असे यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पत्रकारपरिषदेत माध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा अमृत काळातील सर्वजन हिताय, या संकल्पनेवर आधारित अशाप्रकाराचा अर्थसंकल्प आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीचा विचार करत असताना गरीब (Poor), मध्यमवर्गीय (Middle Class), शेतकरी (Farmers), उद्योजक (Entrepreneurs) आणि युवा (Youth) अशा सगळ्या लोकांचा विचार या अर्थसंकल्पाने केला आहे.’ अशी प्रतिक्रिया अर्थसंकल्पावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

तसेच यावर पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘विशेषतः पुढच्या २५ वर्षांमध्ये जो एक विकसित भारत आपण म्हणतोय, त्याच्याकडे जाण्याचा रस्ता या अर्थसंकल्पाने (Budget 2023) स्पष्टपणे दाखवला आहे. याला ग्रोथ बजेट म्हणता येईल, ग्रीन बजेट म्हणता येईल, याला पायाभूत सुविधांचे बजेट म्हणता येईल, याला मध्यमवर्गीयांचे बजेट म्हणता येईल, याला शेवटच्या व्यक्तीचा विचार करणारे बजेट म्हणता येईल. अशा सर्व प्रकारच्या लोकांना या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मदत मिळते आहे.’ असंही यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

दरम्यान, पायाभूत सुविधांवर (Infrastructure) केलेल्या गुंतवणूकीवर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,
‘दहा लाख कोटी रुपयांची पायाभूत सुविधांवरची गुंतवणूक ही देशात मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्मिती करणारी आहे.
२७ कोटी लोक ईपीएफओच्या (EPFO) अंतर्गत येणं म्हणजे गेल्या आठ वर्षात औपचारिक क्षेत्रात वाढलेला रोजगार हा स्पष्टपणे दिसतो आहे.
या पायाभूत सुविधांवरील गुंतवणुकीमुळे प्रचंड मोठा फायदा होणार आहे.’ असंही यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Budget 2023 | budget 2023 deputy chief minister devendra fadnavis reaction on the union budget

 

हे देखील वाचा :

Budget 2023 | ‘या’ आहेत मोदी सरकारच्या शिक्षणक्षेत्रासाठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी

Pune Crime News | दहशत माजवणाऱ्या पुण्यातील सराईत गुन्हेगारावर स्थानबद्धतेची कारवाई, MPDA कायद्यान्वये CP रितेश कुमार यांची दुसरी कारवाई

Rajendra Bathiya On Budget 2023 | व्यापार्‍यांच्या दृष्टीने समाधानकारक अर्थसंकल्प – दि पूना मर्चंटस् चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया

 

Related Posts