IMPIMP

Builder Sanjay Biyani Died | भरदिवसा बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार, जखमी झालेल्या संजय बियाणींचा उपचारादरम्यान मृत्यू

by nagesh
Builder Sanjay Biyani Died | builder sanjay biyani died in firing nanded

नांदेड : सरकारसत्ता ऑनलाइनBuilder Sanjay Biyani Died | नांदेडमध्ये बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर त्यांच्या घरासमोरच अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार (Firing) केला. या गोळीबारात बियाणी आणि त्याचा चालक गंभीर जखमी झाला. जखमी झालेल्या दोघांवर खासगी
रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान संजय बियाणी यांचा मृत्यू (Builder Sanjay Biyani Died) झाला. हा गोळीबार
कोणी केला याचा पोलीस घटनास्थळी येऊन शोध घेत आहेत. ही घटना आज सकाळी शहरातील शारदानगर (Shardanagar) येथील बियाणी यांच्या
घरासमोर 11.30 वाजता घडली. (Builder Shot Dead in Nanded)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

संजय बियाणी हे नांदेड शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक होते. दोन दुचाकीवर आलेले आरोपी त्यांच्या घराजवळ दबा धरुन बसले होते. साडे अकराच्या सुमारास बियाणी घरी आले. गाडीतून उतरताच त्यांच्यावर आरोपींनी गोळ्या झाडल्या. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान (Builder Shot Dead in Nanded) मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह (Senior Police Officers) पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. खंडणीसाठी (Ransom) किंवा व्यावसायिक स्पर्धेतून (Professional Competition) ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याच दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. तसेच घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पोलिसांकडून तपासले जात आहेत. विशेष म्हणजे तीन वर्षापूर्वी संजय बियाणी यांना कुख्यात गुंड रिंदा (Rinda) याने खंडणीसाठी धमकी (Threat) दिली होती. तेव्हापासून त्यांना सुरक्षा (Security) पुरवण्यात आली होती. तीन महिन्यांपूर्वी बियाणी यांच्यासह 15 जणांची सुरक्षा काढण्यात आली होती.

Web Title :- Builder Sanjay Biyani Died | builder sanjay biyani died in firing nanded

हे देखील वाचा :

Pune Crime | डोळ्यात मिरचीपूड टाकून लोखंडी रॉडने मारहाण, महिलेसह तिघांवर FIR

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘संजय राऊतांना लवकरच देशमुख, मलिकांसोबत शिवभोजन थाळी खायला पाठवलं पाहिजे’ – भाजप आमदार नितेश राणे

Anil Bonde | भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याला तीन महिने कारावासाची शिक्षा, जाणून घ्या!

Related Posts