IMPIMP

Pune Crime | डोळ्यात मिरचीपूड टाकून लोखंडी रॉडने मारहाण, महिलेसह तिघांवर FIR

by nagesh
Pune Crime | Criminals robbed the couple in the Bopadev ghat, attacked them with a sword and looted their mobile and Mangalsutra

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | गाडीवर कचरा पडल्याच्या कारणावरुन तिघांनी एकाला डोळ्यात (Eye) मिरचीपूड (Chili Powder) टाकून बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका महिलेसह तिघांवर विमानतळ पोलीस ठाण्यात (Vimantal Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार (Pune Crime) शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास घडला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

शुभम राजेश अग्रवाल Shubham Rajesh Agrawal (वय – 19), गौरव राजेश अग्रवाल Gaurav Rajesh Agrawal (वय – 19) व एका महिलेविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुंदर रामकरण अग्रवाल Sundar Ramkaran Agarwal (वय – 45 रा. लोहगाव) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांचे नातेवाईक असून शेजारी राहतात. फिर्यादी हे घराजवळील झाडाची पाने कट करत होते. त्यावेळी पानांचा पालापाचोळा आरोपींच्या गाडीवर पडला होता. काम झाल्यानंतर झाडून देतो असे फिर्यादी यांनी सांगितले. परंतु फिर्यादी यांचा पुतण्या (Nephew) शुभम याने इतरांना बोलावून घेत लोखंडी रॉडने (Iron Rod) फिर्यादी यांच्या डोळ्यावर मारुन जखमी केले. तसेच आरोपी महिलेने मिरचीपूड फिर्यादी यांच्या डोळ्यात टाकून त्यांच्या पत्नीला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुनील निरगुडकर (API Sunil Nirgudkar) करत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | rod hit him by throwing pepper powder in his eye pune

 

हे देखील वाचा :

Nitesh Rane On Sanjay Raut | ‘संजय राऊतांना लवकरच देशमुख, मलिकांसोबत शिवभोजन थाळी खायला पाठवलं पाहिजे’ – भाजप आमदार नितेश राणे

Anil Bonde | भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याला तीन महिने कारावासाची शिक्षा, जाणून घ्या!

Shiv Sena MP Sanjay Raut | ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत आक्रमक ! सोमय्यांना दिली शिवी, भाजपवर हल्ला; पत्रकारांनाही इशारा

 

Related Posts