IMPIMP

Central Government Agneepath Scheme | 4 वर्ष पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला आणखी एक मोठा निर्णय

by nagesh
Union Home Minister Amit Shah | bjp will dominate mumbai politics says union home minister amit shah hit back shivsena chief uddhav thackeray

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Central Government Agneepath Scheme | सैन्य भरतीसाठी (Army Recruitment) केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ (Central Government Agneepath Scheme) मागील तीन दिवसांपासून गोंधळ सुरू आहे. या योजनेला उत्तर प्रदेशपासून (Uttar Pradesh) तेलंगणापर्यंत 13 राज्यात विरोध होत (Agnipath Scheme Violence) आहे. याचा सर्वाधिक परिणाम बिहारमध्ये (Bihar) दिसून येत आहे. सैन्य भरतीची तयारी करणारे रस्त्यावर उतरून संताप व्यक्त करताना दिसत आहेत. बस-गाड्या, रेल्वेमध्ये जाळपोल होत आहे. रस्तेही चक्काजाम झाले आहेत. पोलिस-प्रशासनाशी संबंधित लोकांवर दगडफेक केली जात आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

काही आंदोलनामुळे सामान्य जनजीवनही मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. दरम्यान, अशातच आता केंद्रीय गृहमंत्रालयाकडून (Union Home Ministry) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अग्निपथ योजनेअंतर्गत सेवेमध्ये 4 वर्ष पूर्ण करणाऱ्या अग्निवीरांसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि आसाम रायफल्स मधील (Assam Rifles) भरतीसाठी 10 टक्के रिक्त जागा राखीव ठेवण्याचा निर्णय गृह मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे. याबाबत माहिती ट्विटच्या माध्यमातून समोर आली आहे. (Central Government Agneepath Scheme)

 

 

गृहमंत्रालयाच्या माहितीनुसार, अग्निवीरांना 2 दलात भरतीसाठी उच्च वयो मर्यादेपेक्षा 3 वर्ष वयाची सूट दिली जाईल. अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीसाठी उच्च वयोमर्यादेच्या पुढं 5 वर्षांसाठी वयोमर्यादा शिथिल असेल. केंद्राने लष्कर भरतीसाठी (Indian Army) नुकत्याच जाहीर केलेल्या ‘अग्निपथ’ योजनेअंतर्गत नव्यानं भरती होणाऱ्यांसाठी प्रवेशाची वयोमर्यादा 17 वर्षे 6 महिने ते 21 वर्ष अशी निश्चित केली होती. मात्र, मागील दोन वर्षे लष्करात भरती प्रक्रिया सुरू करणे शक्य झाले नसल्याची दखल घेत, सरकारने 2022 साठी प्रस्तावित लष्कर भरतीसाठी वयात यंदा सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता 2022 अग्नीपथ योजनेतील भरती प्रक्रियेसाठी उच्च वयोमर्यादा 23 वर्षे केली गेली आहे.

 

Web Title :- Central Government Agneepath Scheme | union home ministry decides to reserve ten percent vacancies capfs assam rifles agniveers

 

हे देखील वाचा :

Pune Crime | वाघोली-चंदननगर परिसरात भर रस्त्यात 24 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग करुन अ‍ॅसिड टाकण्याची धमकी

Solapur Crime | धक्कादायक ! 10 वीत कमी गुण पडतील या भीतीने विद्यार्थिनीने केली आत्महत्या; पण..मिळाले 81 टक्के

SSC-HSC Board Re-Examination | 10 वी आणि 12 वीत अनुत्तीर्ण झालेल्यांसाठी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जारी, जाणून घ्या

 

Related Posts