IMPIMP

Pune Crime | वाघोली-चंदननगर परिसरात भर रस्त्यात 24 वर्षाच्या तरुणीचा विनयभंग करुन अ‍ॅसिड टाकण्याची धमकी

by nagesh
Pune Crime | 'If you are not mine, I will not let you be anyone's'! Threatened the girl and threatened to throw acid on her face

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | मैत्रिणीबरोबर रस्त्याने जात असताना मोटारसायकलवरुन येऊन दोघा टोळभैरवांनी भर रस्त्यात तिचा हात पकडून मारहाण करीत अंगावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी (Threat Of Acid Attack) देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी वाघोली (Wagholi) येथील एका 24 वर्षाच्या तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. 216/22) दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी आदिल रईस मलिक (वय 18, रा. बीडी कामगार वसाहत, चंदननगर) आणि रोहित शरद माने (वय 27, रा. शास्त्रीनगर, येरवडा – Yerwada) यांच्यावर गुन्हा दाखल केला असून रोहित याला अटक केली आहे. ही घटना खराडी येथील एसएनएस बी टु बी कंपनीसमोर शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता घडली. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे सहकारी हे चहा पिण्यासाठी जात असताना दोघे जण मोटारसायकलवरुन आले. त्यांनी फिर्यादी यांना कट मारुन त्यांचा रस्ता अडवला. आदिल याने त्यांचा हात पकडून आपल्याजवळ ओढून त्यांचे मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करुन विनयभंग (Molestation Case) केला. त्यांना हाताने मारहाण करुन जोरात ढकलून दिले. रोहित याने मी तुझ्या अंगावर अ‍ॅसिड टाकेन अशी धमकी दिली. या प्रकाराने घाबरुन त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी रोहित याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक सोनवणे तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | 24 year old girl molested and threatened with acid in Wagholi Chandannagar area

 

हे देखील वाचा :

Solapur Crime | धक्कादायक ! 10 वीत कमी गुण पडतील या भीतीने विद्यार्थिनीने केली आत्महत्या; पण..मिळाले 81 टक्के

SSC-HSC Board Re-Examination | 10 वी आणि 12 वीत अनुत्तीर्ण झालेल्यांसाठी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जारी, जाणून घ्या

MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे लिलावती रुग्णालयात दाखल होणार; रविवारी शस्त्रक्रिया

 

Related Posts