IMPIMP

Central Government | केंद्र सरकारकडून राज्य सरकारला नववर्षभेट; विविध योजनांसाठी मिळाले एवढे कोटी रूपये

by nagesh
Central Government | central government allot 500 crore fund to maharashtra government for various schemes

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – नववर्षाच्या सुरूवातीला केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. राज्यातील विविध योजनांसाठी केंद्र सरकारने (Central Government) महाराष्ट्राला सुमारे ५०० कोटींचा निधी जाहीर केला आहे. यामध्ये भांडवली खर्चासाठी ऊर्जा विभागाला ५० वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यात आले आहे. त्यासाठीच्या पहिल्या टप्प्यात महानिर्मिती व महापारेषणला २५० कोटींच्या कर्जाचे वितरण करण्यात येणार आहे. (Central Government)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

केंद्र सरकारने (Central Government) राज्य सरकारांना भांडवली खर्चासाठी विशेष सहाय्य योजने अंतर्गत ५० वर्षे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेनुसार, महाराष्ट्राला ५०० कोटी रूपये मंजूर करण्यात आले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात अर्थसंकल्पीय पुरवणी मागणीत २५० कोटी वितरीत करण्यास परवानगी मिळाली आहे.

मात्र ही रक्कम राज्यांना ३१ मार्चपर्यंत खर्च करावी लागणार आहे. बिनव्याजी कर्ज रकमेतून ऊर्जा विभागातील कामांसाठी मंजूर केलेल्या ५०० कोटींपैकी केंद्र शासनाकडून प्राप्त झालेली २५० कोटी रक्कम वित्त विभागाने बीम्स प्रणालीवर उबलब्ध करण्यात आली असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. यातील भाग-1 अंतर्गत पहिल्या हप्त्यात प्राप्त झालेल्या रकमेचे उपयोगीता प्रमाणपत्र केंद्र शासनास पाठवल्यानंतरच दुसरा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. ही बाब विचारात घेऊन सदर कर्जाचा विनियोग करून 15 जानेवारी 2023 पूर्वी उपयोगीता प्रमाणपत्र वित्त विभागास सादर करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या दुसरा हप्त्याची रक्कम 31 मार्च 2023 पूर्वी खर्च करणे आवश्यक आहे. या कालावधीत पूर्ण 100 टक्के निधी खर्च न झाल्यास केंद्र शासनाकडून सदर रक्कम वसूल करण्यात येणार आहे.

 

खालीलप्रमाणे होणार निधीचे वितरण:

– साखरी सौर प्रकल्पाला 30 कोटी
– दोंडाएचा सौर प्रकल्पाला 70 कोटी
– ईरइ डॅम सौर प्रकल्पास 30 कोटी
– उलवे नोड जीआयएस सब स्टेशन 27 कोटी 39 लाख
– पावणे जीआयएस सब स्टेशन 21 कोटी
– मानकोली जीआयएस सब स्टेशन 16 कोटी चार लाख
– तिर्थपुरी जीआयएस सब स्टेशन आठ कोटी 93 लाख
– पनवेल जीआयएस 25 कोटी
– शहा सब स्टेशन 12 कोटी 29 लाख
– धानोरा सब स्टेशन 8 कोटी 78 लाख

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Central Government | central government allot 500 crore fund to maharashtra government for various schemes

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | ‘धर्मवीर नाही म्हणणं हा द्रोह, अजित पवारांच्या विधानावर देवेंद्र फडणवीसांची टीका (व्हिडिओ)

E-Car | बापरे! एका चार्जमध्ये ७०० किलोमीटर धावणार ही इलेक्ट्रिक सेडान, नवीन इंटेरियर, नवीन फीचर, नाव आहे…

Budget 2023 | अर्थमंत्री सीतारामन मध्यमवर्गीयांना देऊ शकतात मोठी भेट, टॅक्स सवलत मर्यादा वाढवण्यावर विचार

 

Related Posts