IMPIMP

Chandrakant Patil | औरंगाबादमध्ये चंद्रकांत पाटलांना ‘या’ संस्थेने दाखवले काळे झेंडे

by nagesh
Chandrakant Patil | black flags shown to chandrakant patal in aurangabad protesters arrested by police

औरंगाबाद : सरकारसत्ता ऑनलाईन – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शुक्रवारी महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून राजकारण पेटले आहे. त्यावरून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. शनिवारी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) औरंगाबाद दौऱ्यावर आले होते. यावेळी अनेक संघटनांनी चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात आंदोलन केले आणि त्यांना काळे झेंडे दाखवले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

औरंगाबादच्या गणपती संस्थानमध्ये दर्शनासाठी आलेल्या चंद्रकांत पाटलांना (Chandrakant Patil) अखिल भारतीय महात्मा फुले संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीदेखील करण्यात आली. काळे झेंडे दाखवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. पाटील म्हणाले होते की, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरू केल्या. त्यांना शाळा सुरू करण्यासाठी सरकारने अनुदान दिले नाही, तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली. तेव्हाच्या काळात लोक 10 रुपये देत होते. आता 10 कोटी रुपये देणारे लोक आहेत.

 

त्यावरून हा वाद पेटला होता. त्यांच्यावर महाविकास आघाडीने टीका केली आहे.
संजय राऊत त्यांना अकलेचे कांदे म्हणाले आहेत.
तसेच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीदेखील त्यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लोकवर्गणीतून आणि लोकसहभागातून
शाळा सुरू केल्या. त्यांनी वेळोवेळी आपल्या पदरचे पैसेदेखील खर्च केले होते. त्यांनी कोणापुढे हात पसरले नव्हते.
त्यामुळे पाटलांचे विधान चुकीचे आहे. त्यांनी मंत्रिपदासाठी भीक मागितली होती.
त्यांच्या या विधानाकडे महाराष्ट्रातील जनतेने गांभीर्याने पाहावे. आम्ही त्यांचा निषेध करत आहोत.
चंद्रकांत पाटील आपल्या विधानातून नवीन शाळा, महाविद्यालय सुरू करणाऱ्यांना एकप्रकारे भीक मागा,
असे सांगत आहेत, असे मिटकरी म्हणाले होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Chandrakant Patil | black flags shown to chandrakant patal in aurangabad protesters arrested by police

 

हे देखील वाचा :

Pune ATS | लष्कर-ए-तोयबाच्या दोन संशयितांना पुणे न्यायालयाकडून जामीन; पुणे एटीएसने केली होती अटक

NCP MLA Amol Mitkari | मुख्यमंत्र्यांनाच वाटत नाही ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तर….असे म्हणत अमोल मिटकरींची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका

MNS Leader Vasant More | प्रामाणिकपणा दाखवण्यासाठी वसंत मोरेंची अनोखी शक्कल, “माझ्यावर प्रश्न चिन्ह उभे करणार्‍यांना …

 

Related Posts