IMPIMP

Chandrakant Patil On Pune Koyta Gang | पुणे शहरात उच्छाद घालणार्‍या कोयता गँगवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया; पालकमंत्री म्हणाले – ‘वशिल्याने झालेल्या पोलिसांच्या बदल्याचा हा परिणाम’

by nagesh
Maharashtra Politics News | babri masjid was demolished by shiv sainiks said shinde faction leader sanjay shirsat

पुणे (नितीन पाटील) : सरकारसत्ता ऑनलाईन – Chandrakant Patil On Pune Koyta Gang | शहरातील मोठया उपनगरांमध्ये आणि
परिसरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कोयता गँगने मोठया प्रमाणावर उच्छाद माजवला. कोयते हातात घेवून हत्यारांचा नंगानाच सोशल मिडीयावर
(Social Media) पहावयास मिळाला. रस्त्यावरील नागरिकांना त्रास देणे, लुटमार करणे अन् दिसेल त्याला मारहाण व धमकावण्याच्या घटना शहरात
वेगवेगळया ठिकाणी घडताना दिसल्या (Pune Crime News). दोनच दिवसांपुर्वी संपलेल्या हिवाळी अधिवेशनात देखील त्याचे चांगलेच पडसाद
उमटले. अधिवेशनात विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील हडपसर परिसरात कोयता गँगची मोठया प्रमाणावर दहशत
असल्याचे संबोधले होते. आता त्यानंतर पुणे जिल्हयाचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कोयता गँगवर प्रतिक्रिया दिली. ते
म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या (MVA Govt) काळात वशिल्याने झालेल्या पोलिस अधिकार्‍यांच्या (Maharashtra Police Transfer)
बदल्याचा हा परिणाम आहे. (Chandrakant Patil On Pune Koyta Gang)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, पुणे शहराचे पोलिस आयुक्त रितेश कुमार हे शहरात घडणार्‍या महत्वाच्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. अलिकडील काळात गुन्हेगारांचे धाडस वाढले हे मला देखील मान्य आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना ज्या पध्दतीने पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्या त्याचाही काही प्रमाणात परिणाम आहे. ज्यावेळी पोलिस अधिकारी विशल्याने आणि ओळखीने येतात त्यावेळी ते आपली कामे व्यवस्थितरित्या केली काय अथवा न केली काय या मनस्थितीत असतात. पण गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे सर्व एकेक करून बदलत आहेत. पुणे शहरासाठी आयुक्तालयात 5 नवीन पोलिस उपायुक्त (DCPs In Pune) आणण्यात आले आहेत. पुण्यात नियुक्ती करण्यात आलेल्या सर्वांचीच पार्श्वभूमी स्ट्राँग आहे. शांत शहर म्हणून ओळखले जाणे ही पुण्याची ख्यात आहे. आपण त्या दिशेने लवकरच जाऊ असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. (Chandrakant Patil On Pune Koyta Gang)

 

कोयता गँगचा उपनगरांमध्ये हौदोस…

कोयत्या गँगने (Koyta Gang) गेल्या काही दिवसांपुर्वी हडपसर (Hadapsar) आणि परिसरात मोठया प्रमाणावर उच्छाद माजवला होता. तेथील व्हिडीओ देखील समाजमाध्यमांवर मोठया प्रमाणावर व्हायरल झाल्याचे आपण सर्वचजण जाणतो. एवढेच नव्हे तर परिसरातील नागरिकांनी कोयता गँगचा बंदोबस्त करण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे घातले होते. त्याबाबतचे पत्र देखील सोशल मिडीवर व्हायरल झाले होते. विनाकारण हौदोस घालणारे काही व्हिडीओ आता देखील समाज माध्यमांवर पहावयास मिळत आहे. नुकताच सिंहगड कॅम्पस (Sinhagad Campus) परिसरात हातात कोयते घेवुन दशहत निर्माण करणार्‍यांचा व्हिडीओ देखील सोशल मिडीयावर व्हायरल झाला. पोलिसांनी घटना घडतानाच समाजकंटकाचा पाठलाग केला आणि पोलिसांनी त्यास चांगलाच चोप दिला. सिंहगड कॅम्पस परिसरात दहशत निर्माण करून फरार झालेल्या एकाच्या भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Viyapeeth Police) बीड शहरातून (Beed) मुसक्या आवळल्या आहेत.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’…

‘कोयता गँग’ तसेच 16 वर्षाखालील गुन्हेगारी प्रवृत्तीच्यांचा कायमचा बिमोड करण्यासाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार (Pune CP Retesh Kumar) यांनी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. त्यासाठी त्यांनी एका पोलिस उपायुक्तास नोडल अधिकारी म्हणून देखील नियुक्त केले आहे. शहरातून गुन्हेगारीचा नायनाट करण्यासाठी आणि कोयता गँगचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी थेट आयपीएस असलेल्या पोलिस उपायुक्ताची (IPS Officer In Pune) नोडल अधिकारी म्हणून केवळ नियुक्तीच केली नाही तर त्यांना महत्वाच्या सूचना देखील दिल्या आहे. त्यानुसार संबंधित अधिकार्‍यांनी गुन्हेगारांची मोडस, कार्यक्षेत्र आणि इतर गोष्टींच्या माहितीचे संकलन देखील केले आहे. त्यावर तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस प्रयत्नशील असल्याचे समजते.

 

उपनगरांसह मध्यवस्तीत भलतेच ‘उद्योग’

शहराच्या अनेक प्रमुख उपनगरांमध्ये मोठया प्रमाणावर भलतेच ‘उद्योग’ (Illegal Business) सुरू असल्याची माहिती पोलिसांनी अधून-मधुन केलेल्या कारवाईवरून स्पष्ट होते. असे ‘उद्योग’ उपनगरांमध्ये तर सुरूच आहेत पण त्याचे लोण हे शहराच्या मध्यवस्तीपर्यंत आले आहे. अनेक ठिकाणी ‘थर्टी फस्ट’ला शांततेत निरोप देण्यात आला अन् नूतन वर्षाचे स्वागत उत्साहात देखील करण्यात आले. मात्र, बर्‍याच ठिकाणी मोठया प्रमाणावर संबंधित पोलिसांची मर्जी राखून ‘डांगडिंग’ सुरू आहे असे म्हंटले तर वावगे ठरणार नाही. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी पहिल्याच ‘डब्ल्यूआरएम’मध्ये (WRM) त्यांची भूमिका स्पष्ट केली असली तरी बहुसंख्य पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना ते समजलेले नाही असे जाणवते.

 

कोंढवा, वानवडी अन् गुन्हे शाखेतील पदे रिक्त

कोरोना काळानंतर प्रथमच राज्य गृह विभागाने (Maharashtra Home Dept) सुमारे तीन आठवडयांपुर्वीच
राज्यातील पोलिस निरीक्षकांच्या सर्वसाधारण (Police Inspector Transfer Maharashtra) बदल्या केल्या.
त्यामध्ये पुण्यातील काही पोलिस निरीक्षकांच्या पुण्याबाहेर बदल्या झाल्या तर काहीजण बाहेरून पुण्यात
बदलून आले. सर्वसाधारण बदल्या होवून अनेक दिवस उलटल्यानंतर देखील पुणे शहरातील महत्वाच्या दोन
म्हणजेच कोंढवा (Kondhwa Police Station) आणि वानवडी पोलिस ठाण्याला (Wanwadi Police Station)
अद्यापही वरिष्ठ पोलिस निरीक्षक मिळालेला नाही. तेथे अद्यापही कोणाचीही नियुक्ती झालेली नाही.
दरम्यान, गुन्हे शाखेतील (Pune Police Crime Branch) काही पदे देखील रिक्त आहेत.
अनेक पोलिस निरीक्षक प्रतिक्षेत असताना देखील कोंढवा, वानवडी पोलिस ठाण्यातील आणि गुन्हे शाखेतील पदे रिक्त आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Chandrakant Patil On Pune Koyta Gang | Chandrakant Patal’s reaction to the Koyta gang rampaging in Pune city; The Guardian Minister said – ‘This is the result of the transfer of police by favour of MVA Govt’.

 

हे देखील वाचा :

Maharashtra Politics | आव्हाडांनी औरंगजेबाचं मंदिर बनवावं अन् उद्घाटनाला…, शिंदे गटाच्या नेत्याचा घणाघात

Pune Crime | नववर्षाच्या सुरुवातीला कोथरुड, सिंहगड रस्ता परिसरात घरफोड्या, 64 लाखांचा ऐवज लंपास

CM Bhagwant Mann | पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवास्थानाजवळ आढळला बॉम्ब; प्रचंड खळबळ

Malaika Arora | अभिनेत्री मलायका अरोराला अर्जुनसोबतच्या ‘त्या’ फोटोवरून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

 

Related Posts