IMPIMP

Chandrashekhar Bawankule | अजित पवार मोबाईल बंद ठेवून ८-८ दिवस गायब होतात; अजित पवारांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचे पलटवार…

by nagesh
Ajit Pawar | ajit pawar mocks bjp chandrashekhar bawankule assembly winter session

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन  – राज्याचे हिवाळी अधिवेशन चांगलेच तापले आहे. विरोधकांकडून विविध मुद्यांवर सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले जात आहे. त्यातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल सत्ताधाऱ्यांवर निशाना साधताना ‘करेक्ट कार्यक्रम’ करण्यासंदर्भात वक्तव्य केले होते. त्याचेच पडसाद आता उमटू लागले आहेत. यासंबंधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी अजित पवारांवर टीका केली आहे. (Chandrashekhar Bawankule)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, ‘खरंतर कुणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा हे जनता ठरवते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीत युती राहूनही कधी राष्ट्रवादी ७५च्या वर गेली नाही आणि ते काय करेक्ट कार्यक्रम करणार? बारामती शहराचा विकास म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाचा किंवा पश्चिम महाराष्ट्राचा विकास नाही. मी दाव्यानं सांगतो की बारामती शहर सोडता संपूर्ण लोकसभा मतदारसंघात अजित पवारांच्या वागण्याबद्दल लोकांमध्ये नाराजी आहे.’ असे म्हणत त्यांनी अजित पवारांवर परखड शब्दात टीका केली.

 

त्याबद्दल पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, ‘बारामतीमध्ये हुकुमशाही, मोगलशाहीसारखा कारभार सुरू आहे. माझी एंट्री बारामतीत झाल्यापासून अजित पवारांना भीती वाटत आहे. म्हणूनच काल सभागृहात त्यांनी म्हटलं आहे की करेक्ट कार्यक्रम करू. आमचा करेक्ट कार्यक्रम करण्याची हिंमत त्यांच्यात नाही. त्यांचा केव्हा करेक्ट कार्यक्रम होईल, हे २०२४मध्ये जनता ठरवेल.’ अशा खोचक शब्दात त्यांनी अजित पवारांची कानउघडणी केली.

 

तसेच, त्यांनी यावेळी बोलत असताना अजित पवारांना खुलं आव्हान दिलं आहे.
‘अजित पवारांच्या तोंडी असे शब्द शोभत नाहीत.
अजित पवार आम्हाला माहिती आहे की वेळप्रसंगी आठ आठ दिवस मोबाईल बंद करून पळून जातात.
अंडरग्राऊंड होतात. कधी रडतात. असे अजित पवार बघितले आहेत आम्ही.
त्यामुळे अजित पवारांनी विदर्भात आम्हाला आव्हान देऊ नये.
तसेच त्यांचं कोणतंही, कोणत्याही पातळीवरचं आव्हान आम्ही स्विकारायला तयार आहोत.
त्यामुळे इथून पुढे अजित पवारांनी अशी भाषा करू नये. अशा स्वरूपात खुलं आव्हानचं बावनकुळेंनी अजित पवारांना दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | bjp chandrashekhar bawankule slams ajit pawar ncp

 

हे देखील वाचा :

Beed ACB Trap | अनुदानाच्या चेकवर सरपंच आईची सही घेऊन देण्यासाठी 20 हजार रुपये लाचेची मागणी, मुलावार एसीबीकडून FIR

Raj Thackeray | मनसेच्या मिसळ महोत्सवात राज ठाकरेंचा मिश्किल टोला; म्हणाले… (व्हिडीओ)

Ajit Pawar | परीक्षेला न बसताही डिग्री घेणारे…, अजित पवारांची उदय सामंतांच्या बोगस पदवी प्रकरणावर मिश्किल टिप्पणी

Rohit Pawar | अनिल देशमुखांची अटक ही त्यांना राजकीय दृष्टीकोनातून अडचणीत आणण्यासाठीचीचं; आमदार रोहित पवारांचा भाजपवर घणाघात…

 

Related Posts