मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे आपल्या भाषणातून एखाद्या राजकीय नेत्याची नक्कल फार सुंदर पध्दतीने करत असतात. नुकताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भायखळा येथे मिसळ महोत्सव आयोजित केला होता. त्यावेळी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) केलेल्या छोट्याश्या भाषणात चांगलाच विनोद करत उपस्थितांना पोट धरून हसवले.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
याप्रकरणी मनसेच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून एक व्हिडीओ टाकण्यात आला आहे. आणि त्या व्हिडीओला ‘मनसेच्या मिसळ महोत्सवात मिसळीचा घमघमाट आणि राज साहेबांचे मिश्किल टोले!’ असे कॅप्शन देण्यात आले आहे. (Raj Thackeray)
मनसेच्या मिसळ महोत्सवात मिसळीचा घमघमाट आणि राजसाहेबांचे मिश्किल टोले ! 😋😍🤣#मराठीसंस्कृती #महाराष्ट्रधर्म #महाराष्ट्राचीमुंबई #महाराष्ट्रसैनिक #हिंदवीस्वराज्य #खाद्यसंस्कृती #मिसळ #मिसळप्रेमी #marathiculture #misalpav #misalfestival #marathifood pic.twitter.com/LnxHYlxTyT
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) December 26, 2022
या व्हिडीओमध्ये राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले, ‘कुठेही हातात माईक सोपवला जातो, कोणती जागा आहे, कुठे काय आहे, लोक छान मिसळ खात आहेत, काहीजण गोड खात आहेत. खरंतर अशा ठिकाणी कोणाला बोलायला लावू नये. सनईवाल्यासमोर जर का तुम्ही चिंच खात बसलात तर त्याला सनई देखील वाजवता येत नाही. त्याच्या तोंडातून सारखी लाळ पडते. तशी काहीशी अवस्था आमची अशाप्रसंगी असते. बोलायला सांगतात आणि बाजूने सगळ्या प्रकारचे सुगंध येत असतात. तुम्ही सगळ्यांनी या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा, तसेच तुम्हा सर्वांना इंग्रजी दिनदर्शिकेनुसार मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. नववर्ष आपल्या सर्वांना सुख, समृद्धी, आरोग्य आणि भरभराटीचं जावो आणि निरोगी दीर्घायुष्य मिळो एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’ असे म्हणत त्यांनी उपस्थित मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
मिसळ महोत्सव हा खवय्यांसाठी एक पर्वनीचं असते.
यात विविध प्रकारच्या मिसळींवर खाद्य प्रेमींना ताव मारता येतो.
मनसेचा मिसळ महोत्सव देखील त्याच धर्तीवर आयोजीत करण्यात आला होता.
यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर हे देखील राज ठाकरे यांच्यासोबत व्यासपीठावर
उपस्थित होते. या मिसळ महोत्सवाचा भायखळा वासियांनी चांगलाच आनंद लुटला.
Web Title :- Raj Thackeray | at that time we were like clarinet players funny comment by raj thackeray
Nashik Crime | सुसाइड नोटमध्ये भाजप नेत्यांची नावे लिहून एकाची आत्महत्या, दोघांवर FIR