IMPIMP

Chandrashekhar Bawankule | जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ ट्विटवरुन चंद्रशेखर बावनकुळे संतापले, म्हणाले- ‘इतका नीचपणा…’ (व्हिडिओ)

by nagesh
Chandrashekhar Bawankule | bjp chandrashekhar bawankule slams jitendra awhad tweet aurangjeb

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   –  मागील काही दिवसांपासून महापुरुषांवरील वक्तव्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय (Maharashtra Politics) वातावरण तापले आहे. यातच भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी औरंगजेबाचा उल्लेख औरंगजेबजी असा केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. याच मुद्यावरून राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (NCP MLA Jitendra Awad) यांनी बावनकुळे यांचा एक फोटो ट्विट करुन चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली असे ट्विट केले. यावर आता बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आव्हाडांच्या ट्विटवर स्पष्टीकरण दिले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आव्हाडांनी काय म्हटलं?

जितेंद्र आव्हाडांनी बुधवारी मध्यरात्री चंद्रशेखर बावनकुळेंचा (Chandrashekhar Bawankule) एक फोटो ट्विट केला आहे. ‘औरंगजेबजीच्या कबरीवर फुले वाहताना बावनकुळेजी’, असं खोचक ट्विट केलं आहे. या फोटोमध्ये चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (BJP National President J.P. Nadda) आणि इतर नेते व मुस्लीम धर्मगुरु दिसत आहेत.

 

 

 

ते भूगोल विसरलेत का?

जितेंद्र आव्हाड यांनी फोटो ट्विट केल्यानंतर वाद निर्माण होत असताना त्यावर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. तसेच यावेळी त्यांनी आव्हाडांवर संताप व्यक्त केला आहे. ते म्हणाले, आज जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेबजी यांच्या कबीरवर मी जाऊन दर्शन घेतलं अशी एक पोस्ट केली. जे.पी. नड्डा, मी चंद्रपूरमध्ये पवित्र दर्ग्यावर गेलो होतो. तिथल्या मुस्लीम परिवारांनीही आमच्यासह दर्शन घेतले. त्यावर जितेंद्र आव्हाडांनी काय ट्विट केलं? ते भूगोल विसरलेत का? ते म्हणतात औरंगजेबाच्या थडग्याचं दर्शन घेतलं. इतका नीचपणा? असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आम्ही धर्माच्या विरोधात असतो तर…

पवित्र दर्ग्याचे दर्शन घेतानाची तुलना तुम्ही औरंगजेबाच्या कबरीशी (Aurangzeb’s Tomb) केली आहे. आम्ही धर्माच्या विरुद्ध असतो, तर अटल बिहारी वाजपेयींच्या (Atal Bihari Vajpayee) काळात अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती (President Abdul Kalam) केलं नसतं. धर्म पवित्रच असतो. आमचा विरोध दहशतवादी विचारसरणीला आहे. तुम्ही मुस्लीम समाजाचा, त्यांच्या भावनांचा अनादर केला आहे, अशा शब्दात बावनकुळे यांनी आव्हाड यांच्या खोचक टीकेचा समाचार घेतला.

 

आव्हाडांच्या मनात जो औरंगजेबजी आहे तो मी…

यावेळी बोलताना त्यांनी ‘औरंगजेबी’ या उल्लेखावर स्पष्टीकरण दिले. माझं पूर्ण भाषण ऐकलं, तर तुम्हाला समजेल. मराठीत पत्रकार परिषद सुरू असताना हिंदीत एक प्रश्न आला. त्यांनी विचारलं की ‘राधे राधे’ म्हणणाऱ्यावर तात्काळ कारवाई करा असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं. मग जितेंद्र आव्हाडांच्या मनात जो औरंगजेबजी आहे, तो मी मांडला, असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

 

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | bjp chandrashekhar bawankule slams jitendra awhad tweet aurangjeb

 

 

हे देखील वाचा :

Thane Metro | ठाण्यात मेट्रो – ४ च्या बांधकामावेळी अपघात; पादचारी महिलेचा मृत्यु

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ मागणीला योगी आदित्यनाथ यांची तत्वत: मान्यता, दिले अयोध्या भेटीचे आमंत्रण

Uddhav Thackeray | नाशिकमधील ठाकरे गटाची गळती थांबविण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात…

 

Related Posts