IMPIMP

Uddhav Thackeray | नाशिकमधील ठाकरे गटाची गळती थांबविण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात…

by nagesh
Uddhav Thackeray | uddhav thackerays reaction on income tax raid at bbc office

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाईन – एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि पाठोपाठ १२ नगरसेवक शिंदे गटात गेल्यामुळे ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) मोठे खिंडार पडले होते. त्यासोबत काही दिवसांपासून अजूनही नगरसेवक शिंदे गटात जाण्याची चर्चा आहे. त्यावर आता शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः ही गळती थांबवण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. या महिन्याच्या अखेर किंवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नाशिकमध्ये येणार असून ते नाशिक येथे जाहीर सभा देखील घेणार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर ज्या मतदार संघातील आमदार, खासदार शिंदे गटात गेले आहेत. त्यांच्या मतदार संघात जाऊन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सभा घेत आहेत. नाशिक हा सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. पण शिवसेनेतील बंडाळीनंतर मोठ्या प्रमाणात जिल्ह्याचे पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले होते.

 

नुकतच काही दिवसांपूर्वी नाशिक महापालिकेचे बारा नगरसेवक आणि त्यांचे शेकडो कार्यकर्ते तसेच उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणारे आणि खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जाणारे भाऊसाहेब चौधरी, आणि जिल्हाप्रमुख सुनिल पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे नाशिकमध्ये असणारे ठाकरे गटाचे वर्चस्व कमी झाले. त्यामुळे लागलेल्या ह्या गळतीला रोखण्यासाठी आता थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मैदानात उतरले आहेत.

 

याच्याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे उद्यापासून दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर येणार आहेत. स्वतः उद्धव ठाकरे हे नाशिक येथे सभा घेणार आहेत.
आणि त्यासंबंधीच तेथील स्थानिक नेत्यांशी संजय राऊत बोलणार असल्याचे वृत्त आहे.
संजय राऊतांच्या मागच्या नाशिक दौऱ्यानंतर लगेचच ठाकरे गटाला खिंडार पडली होती.
त्यामुळे संजय राऊतांचा हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे.
नाशिक मधील स्थानिक नेत्यांची भेट घेत ते आढावा घेणार आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, नगरसेवकांच्या गळतील ठाकरे गट (Uddhav Thackeray) आळा घालू शकेल का?
असा प्रश्न नाशिकच्या राजकीय वर्तुळात उपस्थित होत असून संजय राऊत आणि उद्धव ठाकरे याला आळा
घालण्यात यशस्वी होणार का? असा देखील सवाल सर्वसामान्य नाशिककरांच्या मनात येत आहे.

 

Web Title :- Uddhav Thackeray | shivsena uddhav thackeray nashik tour sanjay raut takes review

 

हे देखील वाचा :

Gold-Silver Rate Today | नव्या वर्षात सोनं तेजीत तर चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर

Pune Crime News | बांधकाम व्यावसायिकांना धमकावून 29 लाखांची खंडणी उकळणार्‍या चेतन बालवडकरसह 4 जणांवर गुन्हा दाखल

Mhada Lottery 2023 | आता म्हाडाचे घर घेणं झालं सोप्प! २१ नाही तर लागणार फक्त एवढीचं कागदपत्रे…

 

Related Posts