IMPIMP

Thane Metro | ठाण्यात मेट्रो – ४ च्या बांधकामावेळी अपघात; पादचारी महिलेचा मृत्यु

by nagesh
Thane Metro | metro girder metal plate fell down on womens body died on the spot in thane

ठाणे : सरकारसत्ता ऑनलाईन- ठाणे शहरात मेट्रोच्या (Thane Metro) बांधकामादरम्यान अपघातात एका पादचारी महिलेचा मृत्यु झाला आहे. शहरातील कॅडबरी सिग्नलच्या परिसरात मेट्रो प्रकल्प – ४ चे काम सुरू होते. यावेळी काम करत असताना लोखंडी गर्डरची प्लेट अंगावर कोसळून एका महिलेचा दुर्दैवी अंत झाला. विवियाना मॉलच्या परिसरात असणाऱ्या उत्सव हॉटेल नजीक ही दुर्दैवी घटना घडली. मृत महिलेचे नाव सुनिता कांबळे (३७) असे आहे. मात्र ही दुर्घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. (Thane Metro)

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

ठाणे येथे वडाळा-घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो चारच्या मार्गिकेचे काम सुरू आहे. मेट्रो गर्डरच्या सपोर्टसाठी एका खड्ड्यात ही प्लेट लावण्यात आली होती. आज (दि. ५) सकाळी सुनिता कांबळे या परिसरातून जात असताना अचानक लोखंडी प्लेट त्यांच्या अंगावर पडली. आणि त्याखाली त्या दाबल्या गेल्या. (Thane Metro)

या दुर्घटनेनंतर तात्काळ उपस्थित लोक या महिलेच्या मदतीला धावून आले.
त्यांनी सुनिता यांना प्लेटखालून बाहेर खेचून काढले. तसेच याबाबतची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली.
त्यानंतर राबोडी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. उपस्थित स्थानिकांनी आणि पोलिसांनी मिळून या महिलेचा मृतदेह बाहेर काढला आणि उपचारासाठी तिला ठाणे येथील जिल्हा रूग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी संबंधित महिलेला मृत घोषित केले. लोखंडी प्लेटच्या खाली दबून या महिलेचा जागीच मृत्यु झाल्याचा अंदाज आहे. यासंबंधीचा अधिक तपास सध्या राबोडी पोलिस करत असून याबाबत सीसीटीव्ही फुटेज मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

Web Title :- Thane Metro | metro girder metal plate fell down on womens body died on the spot in thane

हे देखील वाचा :

CM Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ मागणीला योगी आदित्यनाथ यांची तत्वत: मान्यता, दिले अयोध्या भेटीचे आमंत्रण

Uddhav Thackeray | नाशिकमधील ठाकरे गटाची गळती थांबविण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे मैदानात…

Gold-Silver Rate Today | नव्या वर्षात सोनं तेजीत तर चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या आजचे दर

Related Posts