IMPIMP

Devendra Fadnavis | ‘महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावादावर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम’ – देवेंद्र फडणवीस

by nagesh
Maharashtra Politics News | thackeray Group mp priyanka chaturvedi tell why she meet hm amit shahmaharashtra

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – सीमावादावरून सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांत धुसफूस सुरू आहे. बसवराज बोम्मई यांनी प्रक्षोभक घोषणा करून हा वाद उकरून काढला आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण तंग आहे. सीमावादावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक भाष्य केले आहे. सीमावादावर ना महाराष्ट्र निर्णय घेणार, ना कर्नाटक सरकार निर्णय घेणार. सीमावादावर निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार सर्वोच्च न्यायालयाला आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत.

 

महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. त्यामुळे याबाबत कर्नाटकही निर्णय घेऊ शकत नाही आणि महाराष्ट्रदेखील परस्पर निर्णय घेऊ शकत नाही. जो काही निर्णय असेल, तो सर्वोच्च न्यायालय घेणार आहे. त्यामुळे या प्रकरणी कोणीही कोणत्याही प्रकारचा नव्याने वाद निर्माण करण्याची गरज नाही. सीमावादाच्या खटल्यावर महाराष्ट्राने सर्वोच्च न्यायालयात चांगली बाजू मांडली आहे. आता आपल्याला न्याय मिळेल असा विश्वास आहे, असे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई यांचा दौरा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होता.
त्यासाठी एका कार्यक्रमाला दोन मंत्री जाणार होते. पण कर्नाटकने येण्यास मज्जाव केला.
आम्ही ठरवले तर जाऊदेखील शकतो. पण डॉ. आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन हा महत्त्वाचा दिवस आहे.
त्या दिवशी कोणतेही वाद किंवा घटना नको म्हणून आम्ही दौरा पुढे ढकलला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत काय तो निर्णय देतील. पुढे मागे कधीही कर्नाटकला जाता येईल.
पण 6 डिसेंबरला नको. आम्हाला कर्नाटकला जाण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असे फडणवीस म्हणाले.

 

Web Title :- Devendra Fadnavis | devendra phandaviss big statement about borderism said the final decision on this

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पोलीस चौकीजवळील मोबाइल शॉपीत चोरी; 12 लाखांचा मुद्देमाल लंपास

Shreya Bugade | श्रेया बुगडे ‘या’ विनोदवीराची चाहती; त्याच्यासाठी केली खास पोस्ट शेअर

Solapur News | दिव्यांग निधी मिळवण्यासाठीच्या आंदोलनात बहिणीपाठोपाठ अल्पवयीन भावाचा मृत्यू

 

Related Posts