IMPIMP

Chandrashekhar Bawankule | राज्याबाहेर गेलेल्या प्रकल्पावरुन बावनकुळेंचा महाविकास आघाडीला इशारा, म्हणाले- ‘यापुढे खोटारडेपणा केला, तर…’

by nagesh
Chandrasekhar Bawankule | chandrashekhar bawankule warning to anil deshmukh over bjp party joining offer

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वेदांता फॉक्सकॉन (Vedanta Foxconn), एअरबस (Airbus Project) सारखे मोठे प्रकल्प राज्यातून बाहेर गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुंपली आहे. हे उद्योग शिंदे सरकारच्या (Shinde Government) नाकर्तेपणामुळे बाहेर जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर याला महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government) जबाबदार असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी यावरुन महाविकास आघाडीवर टीका करताना इशारा दिला आहे. यापुढे महाविकास आघाडीने खोटारडेपणा केला, तर आम्ही हा खोटारडेपणा हाणून पाडू, असा इशारा चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिला आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हे प्रकल्प त्यांच्याच काळात परत गेले

 

माहिती अधिकाराखाली माहिती (Right to Information) घेतली तर तुमच्या लक्षात येईल, की जे प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत, ते केवळ महाविकास आघाडी सरकारच्या नकर्तेपणामुळे जात आहेत. 18 महिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रालयात नसल्यामुळे, तत्कालीन उद्योग मंत्र्यांनी उपसमितीच्या बैठका न घेतल्याने आणि राज्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण न झाल्याने हे सर्व प्रकल्प त्यांच्याच काळात परत गेले आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केली आहे.

 

 

खोटं बोला पण रेटून बोला

 

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी वेदांताचा प्रकल्प गेल्यानंतर पुण्यात आंदोलन केले होते. मात्र,
माहिती अधिकारात अशी माहिती (RTI) पुढे आली की या जागेचं वाटपच झालं नव्हतं. ‘खोट बोला पण रेटून बोला’,
असा हा प्रकार आहे. सरकार गेल्याने आणि आणि यापुढे आपले सरकार कधीही येणार नाही, हे माहिती असल्याने ते अस्वस्थ आहेत. त्यामुले शेवटची घरघर जी लागली आहे, ती थांबवण्याचा उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) प्रयत्न असल्याचे बावनकुळे म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न

 

राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) रोज पळापळ होते आहे, काँग्रेसची (Congress) हालत खराब झाली आहे.
त्यामुळे तिघे मिळून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अडीच वर्ष त्यांनी काहीच काम केलं
नाही. आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार चांगले
काम करत आहे, तर त्यांच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरु आहे, असेही ते म्हणाले.

 

 

Web Title :-  Chandrashekhar Bawankule | chandrashekhar bawankule criticized mahavikas aghadi leaders

 

हे देखील वाचा :

Priyanka Chopra | भारतात येताच प्रियंकाने मोरबी दुर्घटनेवर शेअर केली पोस्ट, म्हणाली कि….

BJP MLA Nitesh Rane | ‘हिंदू म्हणून वाकड्या नजरेने पाहिलं तर त्याचा…’, आमदार नितेश राणेंचा इशारा

Pune Crime | कोंढवा येथील लॅविटेट आणि द ब्रेक रुम हॉटेलमधील हुक्का बारवर गुन्हे शाखेचा छापा

Kushal Badrike | कुशलच्या इंस्टाग्राम पोस्टखाली चाहत्याने एक खंत व्यक्त केली ; नक्की असं का म्हणालाय हा चाहता पाहा

 

Related Posts