IMPIMP

Chandrashekhar Bawankule | ‘जितेंद्र आव्हाडांचे समर्थन करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल व्हायला हवेत’ – चंद्रशेखर बावनकुळे

by nagesh
Chandrashekhar Bawankule | chandrashekhar bawankule replied to supriya sule allegation on shinde government in jintendra awhad case pune news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन   जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) प्रकरणात राज्य सरकार सुडापोटी कारवाई करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला होता. त्यावर भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आव्हाडांवर राज्य सरकार कोणत्याही सुडबुद्धीने कारवाई करत नाही. त्यांच्या कृत्याचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे त्यांचे समर्थन करणाऱ्यांवर देखील गुन्हा दाखल व्हायला हवा, असे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भाजपच्या महिला पदाधिकारी रीदा रशीद (Rida Rashid) यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात (Mumbra Police Station) राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्यावरोधात विनयभंगाचा आरोप दाखल केला होता. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यांनी राज्य सरकारवर (State Government) आरोप केले आहेत. त्यावर पुण्यात चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. राष्ट्रवादीच्या नेत्यामंध्ये नैतिकता बाकी असेल, तर त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांना पक्षातून निलंबित करावे, अशी मागणी बावनकुळे यांनी केली आहे. तसेच, जितेंद्र आव्हाड यांना जाणीवपूर्वक लक्ष केले जात असल्याचा, राज्य सरकार दपडशाही करत असल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप चुकीचा आहे, असे बावनकुळे म्हणाले. या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. त्यामुळे अशाप्रकारे जितेंद्र आव्हाडांचे समर्थन करणे योग्य नाही. जे त्यांचे समर्थन करत आहेत, त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हायला हवा, असेही चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले आहेत.

 

आव्हाडांवर 72 तासांत जे दोन गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत.
त्यामुळे हे गुन्हे कोणाच्याही तक्रारीवरुन दाखल झालेले नाहीत.
आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आहेत.
दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) नाहीत, हे राष्ट्रवादीने लक्षात घ्यावे, असे देखील चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title :- Chandrashekhar Bawankule | chandrashekhar bawankule replied to supriya sule allegation on shinde government in jintendra awhad case pune news

 

हे देखील वाचा :

Pune Pimpri Crime | हातात कोयता घेऊन व्हिडिओ बनवणं पडले महागात, तरुण गजाआड

CM Eknath Shinde | जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेली कारवाई राजकीय सुडापोटी नाही – CM एकनाथ शिंदे

Chandrashekhar Bawankule | ‘आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीला उमेदवार मिळणार नाही’

Actress Priyanka Chopra | मिथुनच्या ‘या’ गाण्यावर डान्स करताना दिसली बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा, व्हिडिओ व्हायरल

 

Related Posts