IMPIMP

MLA Sanjay Gaaikwad | ‘उद्धव ठाकरे बापाच्या नावाची शिवसेना वाचवू शकले नाहीत, आम्ही त्यांच्या नावाने शिवसेना स्वीकारली’, संजय गायकवाडांची उद्धव ठाकरेंवर टीका

by nagesh
 Sanjay Gaikwad | sanjay raut would trampled by balasaheb thackeray sanjay gaikwad statement viral video

बुलढाणा : सरकारसत्ता ऑनलाइन जिल्ह्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटातील म्हणजे ‘बाळासाहेबांची शिवसेना’ (Shivsena of Balasaheb) गटातील आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. उद्धव ठाकरे आपल्या बापाच्या नावाची शिवसेना वाचवू शकले नाहीत, असे संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आम्हाला अत्यानंद होत आहे की, बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करण्याचे सौभाग्य आम्हा ज्या 50 आमदारांना, 12 खासदारांना (MP) आणि असंख्य शिवसैनिकांना (Shiv Sainik) लाभले, ज्यांनी महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करुन शिवसेना वाढविली, महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांत, ताड्यांत आणि वस्तीत आम्ही भगवा ध्वज फडकविला त्यांचे नाव आमच्या पक्षाला मिळाले, असे संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) म्हणाले.

 

ज्यावेळी आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो, त्यावेळी आम्हाला आम्ही गद्दार आहोत, यांनी आमचा बाप चोरला,
ही शिवसेना नाही, असे हिणवले त्यांना आज निवडणूक आयोगाने (Election Commission) सिद्ध करुन दाखविले
की हीच बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, असा दावा गायकवाडांनी केला.

 

ज्यांनी आम्हाला सांगितले की, माझा बाप चोरला. ते आता बापाच्या नावाची शिवसेना स्वीकारु शकले नाहीत.
त्यांनी स्वत:च्या नावाची शिवसेना सुरु केली आहे. त्यामुळे खरी शिवसेना आमची आहे.
आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शिवसेना स्वीकारली आहे, असे गायकवाड म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- MLA Sanjay Gaaikwad | ‘Shiv Sena could not save Uddhav Thackeray’s father’s name, we accepted Shiv Sena in his name’, Sanjay Gaikwad criticizes Uddhav Thackeray

 

हे देखील वाचा :

MCA Election | आशिष शेलार MCA अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्याची शक्यता

Pune Crime | माथाडीच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या पप्पु खरातला गुन्हे शाखेकडून अटक

Shivsena | किती आले, किती गेले, तरी देखील शिवसेना मजबूत, ‘मशाल’ चिन्ह मिळाल्यावर उद्धव ठाकरे गटाचा जल्लोष

Abdul Sattar | बाळासाहेबांचे नाव मिळाले ही मोठी आनंदाची गोष्ट – अब्दुल सत्तार

 

Related Posts