IMPIMP

Deepak Kesarkar | आम्ही लटके यांचा राजीनामा रोखून ठेवा असे आदेश दिले नाहीत, दीपक केसरकरांची पत्रकार परिषदेतून सेनेवर आगपाखड

by nagesh
Deepak Kesarkar | The recruitment process of Scheduled Tribes category will be implemented in a time-bound manner, informed Deepak Kesarkar in the Legislative Council

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन ऋतुजा लटके (Rutuja Latake) राजीनाम्यावरुन शिवसेना (Shivena) आणि भाजप (BJP)-शिंदे यांच्यात दोन दिवस वाद सुरु होता. आज अखेर न्यायालयाने लटके यांचा राजीनामा (Resignation) स्वीकारण्याचे आदेश आयुक्तांना दिले आणि शिवसेनेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेत शिंदे गटाचे (Shinde Group) प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले आहे. आम्ही लटके यांचा अर्ज रोखून ठेवा, असे आदेश दिले नाहीत, असे दीपक केसरकर (Deepak Kesarkar) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अंधेरी पूर्व विधानसभेच्या रिक्त जागेसाठी पोटनिवडणुका (Andheri By Election) होणार आहेत. त्यासाठी शिवसेनेने दिवंगत आमदार रमेश लटके (Ramesh Latake) यांच्य पत्नी ऋतुजा लटके (Rutuja Latake) यांना उमेदवारी दिली आहे. परंतु त्या महापालिकेत कर्मचारी असल्याने त्यांच्या राजीनाम्याच्या स्वीकारास वेळ लागत होता. परिणामी त्यांच्या उमेदवारीवर गदा येण्याचा संभव होता. यावेळी शिवसेनेकडून महापालिका आयुक्त इक्बाल चहल (Iqbal Chahal) यांच्यावर शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) दबाव टाकत असल्याचा आरोप केला होता.

 

विरोधकांच्या आरोपांना उत्तर देतना दीपक कसेरकर म्हणाले, मुळात राजीनामा दिल्यानंतर तो मान्य होण्याची एक प्रक्रिया असते. ती शिवसेनेला चांगल्या प्रकारे माहित आहे. तरी देखील त्यांनी ऐनवेळी राजीनामा दिला आणि तो मान्य होत नाही, म्हणून आमच्यावर आरोप केले आहेत. भाजप आणि शिंदे यांच्या गटावर आरोप करायचे आणि जनतेची सहानुभुती मिळवायची ही शिवसेनेची खेळी आहे.

 

शिवसेनेने जर त्यांना लटके यांनाच उमेदवारी द्यायची होती तर त्यांनी वेळेत त्यांचा राजीनामा का दिला नाही? शिवसेनेला ती जागा काँग्रेस (Congress) किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) द्यायची होती का?
असे प्रश्न केसरकर (Deepak Kesarkar) यांनी उपस्थित केले आहेत.
त्यांनीच ऐनवेळी लटके यांना उमेदवारी देण्याचे ठरविले आणि म्हणून त्यांना उशीर झाला, असे केसरकर म्हणाले.
यावेळी केसरकरांना शिंदे-भाजपच्या उमेदवाराबद्दल विचारले असता, त्यांनी आज रात्री एकनाथ शिंदे
(CM Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (DyCM Devendra Fadanvis) तो निर्णय घेतील असे सांगितले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title: Deepak Kesarkar | We did not give orders to withhold Latke’s resignation, Deepak Kesarkar’s press conference on Sena

 

हे देखील वाचा :

Maharashtra Crime News | पती -पत्नीची गळा चिरुन हत्या; तालुक्यात प्रचंड खळबळ

Pune Crime | रिक्षाने प्रवास करताना ज्येष्ठ महिलेला मारहाण करुन लुबाडले; रिक्षाचालकाला अटक

Pune Crime | कॉलेजच्या तिसर्‍या मजल्यावरील गर्ल्स टॉयलेटमध्ये शिरुन विकृताचे लैंगिक चाळे; हडपसर परिसरातील घटना

वडगाव र्खुद येथे पंतप्रधान आवास (PM Awas Yojana) योजनेअंतर्गत उभारण्यात आलेला मेगा गृहप्रकल्पातील 1108 सदनिका मार्च 2023 पर्यंत लाभार्थींच्या स्वाधीन करणार – अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे

 

Related Posts