IMPIMP

Chhagan Bhujbal | OBC आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणार

by nagesh
Chagan Bhujbal | chhagan bhujbal reaction on rahul gandhi savarkar statement

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Chhagan Bhujbal | राज्य सरकारने (Maharashtra Government) काढलेल्या ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) अद्यादेशाला सुप्रीम कोर्टाकडून (Supreme Court) स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे राज्य सरकारला एक धक्का मानला जात आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसी समाजात नाराजी दिसून आली. यावरुन आता राज्य सरकारने मोठं पाऊल उचलत काही सवाल उपस्थित केले आहे. राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या पार्श्वभुमीवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले की, ‘ओबीसी आरक्षणावरून (OBC Reservation) देशातील इतर राज्यांना वेगळा आणि महाराष्ट्राला वेगळा नियम का? असा सवाल उपस्थित करत ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्याव्यात किंवा सर्वच निवडणुका पुढे ढकला अशी मागणी त्यांनी केली आहे. भुजबळ यांनी दिल्लीत जावून राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), प्रफुल पटेल (Praful Patel) आणि माजी खासदार समीर भुजबळ (Sameer Bhujbal) तसेच जेष्ठ विधिज्ञांच्या भेटी घेतल्या आहेत.

 

त्यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, ‘सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी राखीव 27 टक्के जागांवर निवडणूक घेण्यास पुढील निर्णयापर्यंत स्थगिती दिली आहे. परंतु, ही तांत्रिक बाब आहे यासाठी संपूर्ण समाजाला वेठीस धरणे चुकीचे आहे. यासाठीच आम्ही न्यायालयीन लढाई लढतो आहे असं मत व्यक्त केले. तसेच राज्य सरकार ओबीसी आरक्षणासाठी न्यायालयीन लढाई लढणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडणाऱ्या वकिलांशी छगन भुजबळ यांनी चर्चा केली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

दरम्यान, ‘महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व जागांवर निवडणुका झाल्या नाही तर स्थानिक स्वराज्य संस्था स्थापन होणार नाही
त्यामुळे सर्वच निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात अश्या काही प्रमुख मागण्या मा. सर्वोच न्यायालयात करण्यात येणार असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रासोबत इतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत ओबीसी आरक्षण (OBC Reservation) शाबूत आहे.
एप्रिल 2021 नंतर उत्तरप्रदेश, गुजरातमध्ये निवडणुका झाल्या.
तर मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आहे.
पण, महाराष्ट्रातील ओबीसींवरच असा अन्याय का? असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला.

 

Web Title :- Chhagan Bhujbal | obc reservation maharashtra government decide to challenge in court to restore reservation

 

हे देखील वाचा :

Rakesh Jhunjhunwala | राकेश झुणझुणवाला यांची गुंतवणूक असलेल्या ‘या’ शेअरमध्ये सुटका; आता गुंतवणूकदारांना खरेदीची संधी मिळणार

Pune Crime | नोकरांनीने घरमालकीणीला दिलं गुंगीचं औषध, बेशुद्ध करुन पळवला लाखोंचा ऐवज

Indian Railway IRCTC | आता तुम्ही कोणत्याही स्टेशनवरून ट्रेनचा प्रवास सुरू करू शकता, फक्त ‘हे’ किरकोळ काम करावे लागेल

 

Related Posts