IMPIMP

Chhagan Bhujbal On Sanjay Raut | छगन भुजबळ यांचे परखड भाष्य; म्हणाले – ‘संजय राऊत थोडक्यात वाचले, नाही तर उलटे झाले असते’

by nagesh
Chhagan Bhujbal On Sanjay Raut | NCP leader and maharashtra cabinet minister chhagan bhujbal on rajya sabha election result 2022 shivsena mp and leader sanjay raut

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Chhagan Bhujbal On Sanjay Raut | संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) निकालात धक्कादायक निकाल लागले आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीत सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात उतरले होते. सहाव्या जागेसाठीची लढत चुरशीची झाली. यामध्ये भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक (BJP Candidate Dhananjay Mahadik) यांनी शिवसेनेचे (Shivsena) संजय पवार (Sanjay Pawar) यांचा पराभव केला. या निकालानंतर सत्ताधारी आणि विरोधकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीचे (NCP) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal On Sanjay Raut) यांनीही या निकालावर परखड मत व्यक्त केले आहे. संजय राऊत (Sanjay Raut) थोडक्यात वाचले नाहीतर उलटे झाले असते, संजय पवार निवडून आले असते आणि राऊत मागे राहिले असते, असे विधान छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

छगन भुजबळ यांनी परखड मत व्यक्त करताना संजय राऊत यांना सल्ला देखील दिला आहे. संजय राऊत यांनी आता अपक्षांची नाव घेऊन त्यांना दुखवण्यापेक्षा लोकांना जवळ करावं असं ते म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. भुजबळ पुढे म्हणाले, महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) चारही उमेदवार निवडून यावेत, यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. मात्र दुर्दैवाने चौथ्या उमेदवाराचा पराभव झाला. पण महाविकास आघाडीला हा मोठ्ठा धक्का आहे असे नाही, आमच्याकडे 166 पेक्षा जास्त आमदार (MLA) होते. आम्ही नियोजनात चुकलो, अशी स्पष्ट कबुली भुजबळ यांनी दिली. (Chhagan Bhujbal On Sanjay Raut)

 

मतांची व्यवस्था करण्यात आम्ही कमी पडलो
भाजपने दोन उमेदवारांना 48 – 48 मते दिली. पहिल्या फेरीनंतर ज्याला जास्त मतं आहेत, त्यांची मत इतरांना ट्रान्सफर होतात. भाजपची मते ट्रान्सफर झाली, आमची मते ट्रान्सफर होण्याचा योगच आला नाही. संजय राऊत यांनाच अडचण निर्माण होते का ? अशी परिस्थिती निर्माण झाली होती. महत्वाच्या नेत्यांना आधी सेफ करायला पाहिजे होते. आम्ही 170 पेक्षा 180 मतांची व्यवस्था करायला पाहिजे होती, यामध्ये आम्ही कमी पडलो, असेही भुजबळ यांनी सांगितले.

 

फडणवीस लोकांना जवळ करण्यात यशस्वी ठरले
पवार साहेबांचे मार्मिक स्टेटमेंट आले आहे, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) अधिक लोकांना जवळ करण्यात यशस्वी ठरले.
याचा दुसरा अर्थ आम्ही तिन्ही पक्षाच्या लोकांनी समजून घेतला पाहिजे. अधिक लोक जवळ केली पाहिजेत.
तिन्ही पक्षाच्या आमदारांची नाराजी मोठ्या प्रमाणात उफाळून आली होती.
नाराजी निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यायला पाहिजे.
महाविकास आघाडीचा आमदार आपल्याच पक्षाचा असतो, असे समजून काम करायला पाहिजे.
आमदार दुखावला जाणार नाही, त्यांच्या कामात अडथळा होणार नाही, याची शिकवण आम्हाला मिळाली आहे,
अशी कबुली छगन भुजबळ यांनी दिली.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :-  Chhagan Bhujbal On Sanjay Raut | NCP leader and maharashtra cabinet minister chhagan bhujbal on rajya sabha election result 2022 shivsena mp and leader sanjay raut

 

हे देखील वाचा :

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा, म्हणाले – ‘आम्हाला मदत करणार्‍या आमदारांचं तुम्ही वाकडं करू शकत नाही, कारण…’

Amruta Fadnavis In Pune | वेश्या व्यवसायाला पण एक डिगनीटी मिळायला पाहिजे ! पुण्यात अमृता फडणवीसांच्या हस्ते वेश्यांसाठी मोफत आरोग्य शिबीराचं उद्घाटन (व्हिडीओ)

Pune Pimpri Crime | खळबळजनक ! हिंजवडी परिसरात दारु पिल्याचा जाब विचारल्याच्या रागातून इंजिनिअर पत्नीचा खून, इंजिनिअर पतीचं कृत्य

 

Related Posts