IMPIMP

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा कडक इशारा, म्हणाले – ‘आम्हाला मदत करणार्‍या आमदारांचं तुम्ही वाकडं करू शकत नाही, कारण…’

by nagesh
Devendra Fadnavis | bjp led government in maharashtra will last 25 years devendra fadnavis Maharashtra Political Crisis

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन Devendra Fadnavis | राज्यसभेच्या (Rajya Sabha elections) तीनही जागा जिंकून भाजपने (BJP) राज्यातील आघाडील सरकारला एक इशारा दिला आहे. विजयाच्या पार्श्वभूमीवर आज मुंबईत भाजपने तिन्ही उमेदवारांचा सत्कार केला आहे. त्यावेळी भाजपचे अनेक नेते, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारला (Thackeray Government) गर्भित इशारा दिला आहे. ‘राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या गोटातील ज्या आमदारांनी आपल्याला मदत केली आहे त्यांना काहीही होणार नाही. कारण महाविकास आघाडीने त्यांच्यावर कारवाई करायची ठरवली तर सरकार पडू शकते,’ असं फडणीसांनी म्हटलं आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ”राज्यसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर तुम्ही कोणामुळे जिंकले आहात हे आम्हाला माहितीये, असा दावा मविआतील काही नेत्यांनी केला. त्यांनी खरंच ही गोष्ट माहिती असेल तर ते आपल्याला मदत करणाऱ्यांवर कारवाई करणार नाहीत. याचं कारण म्हणजे महाविकास आघाडीला त्यांचे सरकार टिकवायचे आहे. त्यामुळे मविआ आपल्याला मदत करणाऱ्यांवर कारवाई करायला गेली तर ते आमदार पक्षाची साथ सोडतीलच. पण त्यांच्यासोबत महाविकास आघाडीत असूनही मनाने आपल्यासोबत असलेल्या व दबावामुळे आपल्याला मदत न करू शकणारे आमदारही सरकारमधून निघून जातील.” असं ते म्हणाले.

 

पुढे फडणवीस म्हणाले, “2019 साली मोदींवर विश्वास ठेऊन महाराष्ट्राच्या जनतेने सेना-भाजपला क्लिअर मॅन्डेट दिलं होतं.
पण, या सत्तेचा अपमान झालं. पण आमच्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही बनविलेलं सरकार चालवून दाखवा.
एकतरी चांगलं काम करुन दाखवा. अडीच वर्षाचा काळ गेला, परंतु, दाखविण्यासाठी एक काम नाही.
मोदी सरकारची (Modi Government) कामे या सरकारला दाखवावी लागतात.
जीएसटीचा पैसा दिल्यानंतरही यांची सारखी तीच ओरड असते. पेट्रोल डिझेलचे दर आणखी कमी करायला तयार नाही.
पण या सरकारला इंधनाचे भाव कमी करायला लागतील.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीच्या सहा जागा आपण लढवतो आहोत. कोणतीही निवडणूक सोपी नसते.
पण सरकारमधील अंर्तविरोध पाहता आणि ‘सिक्रेट बॅलेट वोट’ सिस्टीम पाहता आपल्याला चांगलं मतदान होईल.
सद्सदविवेकबुद्धीला स्मरुन अनेक आमदार आपल्याला मतदान करतील, असंही ते म्हणाले.

 

 Web Title :- Devendra Fadnavis | if mahaviaks aghadi take action on mlas who support bjp in rajya sabha election 2022 then mva govt will fall down says devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

Amruta Fadnavis In Pune | वेश्या व्यवसायाला पण एक डिगनीटी मिळायला पाहिजे ! पुण्यात अमृता फडणवीसांच्या हस्ते वेश्यांसाठी मोफत आरोग्य शिबीराचं उद्घाटन (व्हिडीओ)

Pune Pimpri Crime | खळबळजनक ! हिंजवडी परिसरात दारु पिल्याचा जाब विचारल्याच्या रागातून इंजिनिअर पत्नीचा खून, इंजिनिअर पतीचं कृत्य

Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीला पळवून नेवून लैंगिक अत्याचार, 20 वर्षीय तरूणाचं कृत्य

 

Related Posts