IMPIMP

बाल लैंगिक आत्याचार प्रकरण : माजी वरिष्ठ सनदी अधिकारी मारूती सावंतांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला; जाणून घ्या संपुर्ण Case

by bali123
MLA Devendra Bhuyar | amravati morshi mla devendra bhuyar sentenced 3 months jail for abusing tehsildar

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन चॉकलेट आणि खाऊचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक आत्याचार केल्याप्रकरणी कृषी परिषदेच्या माजी महासंचालकाचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. विशेष न्यायाधीश आर. व्ही अदाने यांनी हा आदेश दिला. मारुती हरी सावंत Maruti Sawant (वय ६५) असे कृषी परिषदेच्या माजी महासंचालकाचे नाव आहे. सावंत याला २०१५ मधील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्या विरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सध्या तो येरवडा मध्यवर्ती कारागृहात आहे. या प्रकरणात जामीन मिळावा म्हणून त्याने अर्ज केला होता. सिंहगड रोड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या सदरील गुन्हयाचा तपास तत्कालीन सहाय्यक आयुक्त आणि सध्याचे पुणे ग्रामीणचे अप्पर पोलिस अधीक्षक मिलींद मोहिते यांनी केला आहे.

कर्जत-जामखेडमधील शेतमाल साठवणुकीची चिंता कायमची मिटणार; मिरजगाव व खर्डा येथे वखार उभारणीस मान्यता, आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्याला यश

लहान मुलींना चॉकलेट, खाऊचे अमिष दाखवून त्यांचेवर बाल लैंगिक आत्याचार केले. तसेच अश्‍लील व्हीडिओ दाखवून मुलींच्या मनास लज्जा उत्पन्न होर्इल असे कृत्य त्यांनी केले. पोलीसांत तक्रार आल्यानंतर त्यावर भांदवि कलम ३७६(अ), ३५४(अ) (ब), ५०६, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२चे कलम ४,६,८,१० तसेच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अधिनियम १९८९चे कलम ३ (१), ३ (२) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ कलम ६७ (अ), (ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

तुम्ही सुद्धा आहात PhonePe यूजर तर घरबसल्या घेऊ शकता ICICI Pru चा टर्म इन्श्युरन्स, कुटुंबाला मिळेल 25 लाख रुपयांपर्यंत सुरक्षा

सावंत Maruti Sawant यांच्या घरझडतीत सुमारे साडेतीन हजार अश्‍लील व्हीडिओ मिळून आले होते. कोरोना महामारी तसेच वय ६५ वर्षापेक्षा जास्त असल्याच्या कारणावरून व महाराष्ट्र विधी सेवा प्रधिकरणाच्या १२ मे २०१९च्या शिफारसीस अनुसरुन तात्पुरता जामीन मिळावा म्हणून न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. त्यास विशेष सरकारी वकील प्रताप परदेशी यांनी विरोध केला. आरोपीचा अर्ज हा उच्च अधिकारी समितीच्या शिफारसीस अनुसरुन नाही. आरोपी हा उच्च पदस्थ असल्याने व हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने आरोपीस जामीन मंजूर करू नये, असा युक्तिवाद ॲड. परदेशी यांनी केला.

Also Read :

‘ती फाईल कोणत्या भुतांनी पळवली, याचा खुलासा करावा’; शिवसेनेची राज्यपालांवर टीका

उद्धव ठाकरेच Best CM ! ‘कोरोना’ची दुसरी लाट प्रभावीपणे हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती

 

Atul Bhatkhalkar : ‘राज्यपालांना विमानातून उतरवणार्‍या सत्ताधार्‍यांनी राज्यघटना शिकवू नये’

Tiger 3 मध्ये ‘हा’ अभिनेता साकारणार पाकिस्तानी एजंटची भूमिका

Related Posts