IMPIMP

खुशखबर ! भारतात मुलांना याच महिन्यात मिळू शकते व्हॅक्सीन, जाणून घ्या कुठपर्यंत पोहचली तयारी

by omkar

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन – कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी जास्त धोकादायक असल्याचे वृत्त असतानाच एक चांगली बातमी आहे. मुलांसाठी सुद्धा लवकरच व्हॅक्सीन उपलब्ध होऊ शकते. केंद्र सरकारने शुक्रवारी संकेत दिले आहेत की, मुलांसाठी कोरोनाची लस याच महिन्यात येऊ शकते. सरकारनुसार, जायडस कॅडिला ( zydus vaccine) च्या व्हॅक्सीनला लवकरच मंजूरी दिली जाऊ शकते, जायडस कॅडिला ( zydus vaccine) या लसीची चाचणी 12-18 वर्ष वयाच्या मुलांवर सुद्धा झाली आहे.

नागिण 3 फेम अभिनेता पर्ल पुरी याला बलात्कार प्रकरणात अटक

नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत म्हटले की,
सध्या कोव्हॅक्सीनची मुलांवर चाचणी सुरू आहे, परंतु ती पूर्ण होण्यास जास्त वेळ लागणार नाही,
कारण चाचणी प्रतिकारशक्तीची होते. तर जायडस कॅडिलाच्या व्हॅक्सीनची चाचणी मुलांवर झाली आहे. आशा आहे की, पुढील दोन आठवड्या ती लायसन्ससाठी येऊ शकते. लसीला मंजूरी देताना ती मुलांना देण्याबाबत सुद्धा निर्यण घेतला जाऊ शकतो.

चाचणी 800-100 मुलांचा सहभाग
जायडस कॅडिलाच्या व्हॅक्सीनच्या तिसर्‍या टप्पयातील चाचणी पूर्ण झाली आहे.
या चाचणीत 800-100 मुले सहभागी होती, ज्यांचे वय 12-18 वर्षाच्या दरम्यान आहे.
यासाठी या व्हॅक्सीनला 12-18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी सुद्धा मंजूरी मिळण्याची प्रबळ शक्यता आहे.
पॉल यांनी सुद्धा संकेत दिल आहेत.
मात्र, अंतिम निर्णय एक तज्ज्ञ गट चाचणीच्या आकड्यांच्या आधारावर घेतो.
जर दोन आठवड्यांच्या आत लायसन्ससाठी अर्ज केला तर जास्तीत जास्त आणखी एक आठवडा मंजूरीसाठी लागेल. म्हणजे याच महिन्यात लस उपलब्ध होऊ शकते.

झायडस कॅडिला लसीची माहिती

ही व्हॅक्सीन तीन डोसची आहे.
ही त्वचेसाठी दिली जाणारी इंट्राडर्मल लस आहे.
ती इंजेक्शनने न देता एका वेगळ्या डिव्हाईसने त्वचेच्या आत टाकली जाते.
यासाठी मुलांना ती जास्त उपयोगी आहे.
ही लस यूके, ब्राझील, दक्षिण अफ्रीकासह डबल व्हेरिएंटवर सुद्धा अलिकडेच अपडेट केली आहे.
लसीची चाचणी सुमारे 28 हजार लोकांवर झाली आहे, ज्यामध्ये एक हजारच्या जवळपास 12-18 वर्षाची मुले आहेत.
भारतात 12-18 वर्ष वयोगटाची सुद्धा 13-14 कोटी लोकसंख्या असल्याने त्यांच्यासाठी किमान 25-26 कोटी डोस हवे आहेत.
कॅडिला दरमहिना 1-2 कोटी डोस तयार करू शकते. आता ही क्षमा 2.5-3 कोटी होईल.

 

Also Read:- 

Pune : पीएमपी संचालक राजीनामा नाट्याचा पुढील अंक ‘पोलिस ठाण्यात’ ! भाजपच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘हल्ला’

Gold Silver Price Today : 2 दिवसांमध्ये सोनं 1000 रूपयांनी ‘स्वस्त’, चांदी देखील घसरली; जाणून घ्या आजचे दर

कल्याणमध्ये एका घरात आढळली शेकडो कोरी मतदान ओळखपत्र, प्रचंड खळबळ

मोफत रेशन घेण्यासाठी घरबसल्या बनवा रेशन कार्ड; जाणून घ्या ऑनलाइन प्रोसेस

Monsoon 2021 : 2 दिवसांत महाराष्ट्रात धडकणार ‘मान्सून’ !

Coronavirus : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून कसे रहायचे सुरक्षित? आतापासून सुरू करा ‘ही’ 8 कामे

Devendra Fadnavis : ‘प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु, कालचा गोंधळ जरा जास्तच झाला’ (व्हिडीओ)

राजीव सातव यांच्या जागेवर आता कोण? ‘राहुल-प्रियांका’ यांच्यात नावावरून मतभेद

नारायण राणेंच्या टीकेनंतर खा. संभाजीराजेंचं सूचक ट्वीट, म्हणाले… (zydus vaccine)

Devendra Fadnavis : ‘राज्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि 5 सुपर मुख्यमंत्री’ (व्हिडीओ)

 

Related Posts