IMPIMP

Chitra Wagh | ‘महाराज असते तर कडेलोट केला असता या सरकारचा’; भाजपच्या कार्यक्रमाला गेल्याने शिवसेनेच्या आमदाराची भाऊजयला मारहाण !

by nagesh
Chitra Wagh | shivsena mla ramesh bornare beating for sister in law jayashree bornare chitra wagh said

सरकारसत्ता ऑनलाइन – Chitra Wagh | औरंगाबादमधील वैजापूर (Vaijapur) येथील शिवसेना आमदार रमेश बोरनारे (Shivsena MLA Ramesh Bornare) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रमेश बोरनारे यांनी महिलेला मारहाण केली आहे. संबंधित महिला ही बोरनारे यांची भाऊजय असल्याची माहिती समजत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) निशाणा साधला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

छत्रपती शिवाजी महाराज असते तर या सरकारचा कडेलोट केला असता. हे सरकार गोरगरीबांचं धार्जीणं नाही तर सरकारचे कलाकारी मंत्री आमदार खासदार व त्यांच्या बगलबच्चे धार्जीण आहे, अशा शब्दात चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

 

 

शिवरायांच्या महाराष्ट्रात वैजापूरचा शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांनी भाजपच्या कार्यक्रमाला का गेली ? असं म्हणत महिलेला बेदम मारहाण केली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. परंतु, कोणतीही कारवाई झाली नाही. उलट पीडितेवरचं ॲट्रोसिटीचा (Atrocity) गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावर महिलाधोरणकर्ते काही बोलणार का ?, अजून किती बलात्कारी व महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना वाचवणार आहात ?, असा प्रश्न चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

 

दरम्यान, ज्या महिलेला मारहाण झाली त्या भाजपचे नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. त्यामुळे त्यांना मारहाण झाल्याचं तक्रारीमध्ये सांगण्यात आलं आहे. यावर रमेश बोरनारे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

Web Title :- Chitra Wagh | shivsena mla ramesh bornare beating for sister in law jayashree bornare chitra wagh said

 

हे देखील वाचा :

Narayan Rane | ‘दुसरा कोणी असता तर पदावर बसला नसता’; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Pune Corona Update | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 535 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Heart Failure | ‘या’ कारणांमुळे होते हार्ट फेल ! वाचण्यासाठी डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

Pune Crime | राष्ट्रीय पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षांच्या व्याही, जावई आणि एकाविरूध्द गुन्हा ! व्यावसायिक व न्यायालयाच्या फसवणूकीचे प्रकरण; कोहिनुर ट्रेड होम प्रा. लि. कंपनीच्या शंकर काळभोरांविरूध्द FIR

 

Related Posts