IMPIMP

CM Eknath Shinde | सत्तेत असलेल्या भाजप आमदाराचा थेट मुख्यमंत्र्यांनाच सवाल; म्हणाले….

by nagesh
CM Eknath Shinde | bjp leader pravin darekar shouted at cm eknath shinde at assembly winter session

नागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन- राज्याचे हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरात सुरू आहे. यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच संघर्ष बघायला मिळत आहे. विविध मुद्यांवरून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यातच विधानपरिषदेमध्ये भाजप आमदार प्रविण दरेकरांनी एक प्रश्न उपस्थित केला असता त्यावर माहिती घेऊन सांगतो असे मुख्यमंत्री शिंदे बोलताच प्रविण दरेकर चिडले आणि त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच (CM Eknath Shinde) रागात सवाल केला. त्यावर विधानपरिषदेच्या उपसभापतींनी प्रविण दरेकरांना समज दिली. (CM Eknath Shinde)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

परळ येथील रूग्णालयाच्या कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटीचा प्रश्न केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे. त्यासाठी राज्य शासन पाठपुरावा करणार का असा सवाल विधानपरिषद आमदार प्रसाद लाड आणि प्रविण दरेकर यांनी केला. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की याबाबतची माहिती घेतली जाईल. त्यावर आमदार प्रविण दरेकर आक्रमक झाले. हा २०० कोटींचा घोटाळा आहे. माहिती कसली घेता, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारला. यावर आक्रमक भूमिका घेत विधानपरिषद सभापती निलम गोऱ्हे यांनी ‘तुम्ही मुख्यमंत्र्यांनाही बोलू देत नाहीत. तुम्ही विरोधी पक्षात आहात का?’ असा सवाल त्यांनी दरेकरांना केला. (CM Eknath Shinde)

 

मुंबई उपनगरातील भगवती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या रूग्णालयाची दुरावस्था झाली आहे.
या ठिकाणी अत्याधुनिक सुख सुविधा नाहीत. मुंबई उपनगरातील ही महत्वाची रूग्णालये असून वसई,
विरार भागातून लोक इथ उपचारासाठी येतात. सुविधांअभावी लोकांना येथून मुंबई शहरातील नायर किंवा
केईएम रूग्णालयात जावे लागते. असा मुद्दा या प्रश्नाद्वारे विधिमंडळात उपस्थित करण्यात आला होता.
त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या रूग्णालयांच्या दुरावस्थेबाबत विधानसभेत
देखील चर्चा झाली आहे. महापालिकांच्या रूग्णालयांसाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे जाहीर केले आहे.
मात्र आमदार दरेकरांनी मांडलेल्या भगवती व डॉ. आंबेडकर रूग्णालयाच्या प्रश्नावर आजच मुंबई महापालिका
आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना सुचना दिल्या जातील.
तसेच या रूग्णालयांच्या सुधारणेसाठी दोन महिन्यांचे नियोजन करून निधी दिला जाईल.
असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानपरिषदेत बोलताना म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | bjp leader pravin darekar shouted at cm eknath shinde at assembly winter session

 

हे देखील वाचा :

Entertainment News | ‘अलिबाबा’ मालिकेत तुनिषा शर्माची भूमिका कोण साकारणार? निर्मात्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Election Commission Of India | मतदान प्रक्रियेत होणार मोठा बदल; आता देशात कुठेही करता येणार मतदान

MP Sanjay Raut | शिंदे गट शिवसेना भवनाचा ताबा घेणार? संजय राऊत म्हणाले -‘एक बाप असेल तर…’

 

Related Posts