IMPIMP

Election Commission Of India | मतदान प्रक्रियेत होणार मोठा बदल; आता देशात कुठेही करता येणार मतदान

by nagesh
Election Commission Of India | india election commission may be changing voting process

दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाईन  – आता देशात कुठेही मतदान करता येणार आहे. लवकरच याबाबतची यंत्रणा कार्यान्वीत होणार असल्याचे सुतोवाच निवडणूक आयोगाकडून (Election Commission Of India) मिळाले आहेत. बऱ्याचदा गाव व शहराबाहेर राहणाऱ्या मतदाराला आपला मतदानाचा हक्क बजावता येत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून हे महत्वाचे पाऊल उचलले गेल्याचे समजते. त्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली असून नागरीकांना देशातील कुठल्याही कोपऱ्यातून आता मतदान करता येणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) राज्यांकडून मतं मागवली आहेत. ३१ जानेवारीपर्यंत राज्यांना आपले मत लिखीत स्वरूपात निवडणूक आयोगाला पाठवायचे आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

निवडणूक आयोगाच्या (Election Commission Of India) या निर्णयाचा फायदा लाखो भारतीयांना होणार आहे. नोकरी किंवा शिक्षणासाठी परराज्यात राहणाऱ्या भारतीयांना याचा विशेष फायदा होईल. त्यासाठीच निवडणूक आयोगाने हा पुढाकार घेतल्याचे बोलले जात आहे. त्यांना आता मतदानासाठी घरी यावं लागणार नाही. त्यांना रिमोट व्होटींगच्या आधारे आता भारतातून कुठुनही मतदान करता येणार आहे. यासाठी निवडणूक आयोगाने एक प्रोटोटाईप रिमोट इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन विकसीत केले असून याचा नमुना दाखवण्यासाठी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना आमंत्रित देखील केले आहे.

 

देशातील अनेक राज्यांमध्ये निवडणूका सुरू असतात. मतदानासाठी वयाची अट पूर्ण करणाऱ्या प्रत्येक मतदाराला मतदानाचा अधिकार असतो. भारतीय राज्यघटनेनुसार वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नागरीकास मतदानाचा अधिकार असतो.

 

या प्रक्रियेचा लाभ वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या तसेच मतदार म्हणून नोंदणी केलेल्या प्रत्येक नागरीकास या
सेवेचा फायदा घेता येणार आहे. या व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय मतदानात
या सुविधेच्या आधारावर मतदान करू शकणार आहेत. अपात्रतेचे निकष पूर्ण केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला
मतदानापासून रोखले जाऊ शकत नाही. प्रत्येक मतदारास एक मत देण्याचा अधिकार आहे.
ज्या मतदारसंघात त्याने स्वतःची नोंदणी केली आहे. तेथेच तो मतदान करू शकतो.
निवडणूक आयोगाच्या (Election Commission Of India) या निर्णयाचे स्वागत सर्व स्तरांतून होत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Election Commission Of India | india election commission may be changing voting process

 

हे देखील वाचा :

MP Sanjay Raut | शिंदे गट शिवसेना भवनाचा ताबा घेणार? संजय राऊत म्हणाले -‘एक बाप असेल तर…’

Pune Crime News | हिंदी मालिकांमध्ये काम देण्यासाठी ऑडिशनच्या नावाखाली तरुणीची 71 हजारांची फसवणूक; अनेकांना गंडा घातला असण्याचा संशय

Pune Cyber Crime News | ‘फास्ट’ घरपोच तिकीट मागविताना खात्यातून गेले ९० हजार FAST; सायबर चोरट्यांनी घातला गंडा

 

Related Posts