IMPIMP

CM Eknath Shinde | विधानसभेनंतर लोकसभेत शिवसेनेचे साम्राज्य हादरणार?

by nagesh
CM Eknath Shinde | information is coming out that some mlas of the shinde faction feel injustice in the cabinet expansion

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन CM Eknath Shinde | राज्याचे राजकारण बंडखोरीने हादरवून सोडणारा शिंदे गट आता आपला मोर्चा लोकसभेच्या सदस्यांकडे वळवण्याच्या तयारीत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार शिवसेनेतील काही खासदार (Shivsena MPs) सुद्धा बंडखोरीच्या तयारीत असून शिंदे यांनी या खासदारांची नुकतीच बैठक घेतली आहे. शिवसेनेच्या एकुण 18 लोकसभा खासदारांपैकी 6 खासदार शिंदे गटात गेले असल्याची खात्रीशीर बातमी सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. यामुळे आगामी काळात शिवसेनेसमोरील संकट आणखी वाढणार असल्याचे चिन्ह आहे. (CM Eknath Shinde)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री (Chief Minister) पदावरून पायउतार व्हावे लागले होते. तसेच राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Government) सरकार कोसळले होते. भाजपाने (BJP) पडद्यामागून या सर्व हालचाली केल्याने त्याचा मोठा फटका शिवसेना पक्षाला बसला आहे. डॅमेज कंट्रोलसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर नेते धावपळ करत असतानाच आता काही खासदारांनी सुद्धा बंडाचा झेंडा बाहेर काढल्याचे वृत्त असल्याने शिवसेनेसाठी ही अग्नीपरीक्षा ठरणार आहे.

 

 

 

शिवसेनेचे हे खासदार शिंदे गटाच्या वाटेवर?
सूत्रांच्या माहितीनुसार, शिवसेनेचे दोन तृतीयांश खासदार फोडण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या खासदारांच्या घेतलेल्या बैठकीला 18 पैकी 6 लोकसभा खासदार उपस्थित होते. यामध्ये राहूल शेवाळे (Shivsena MP Rahul Shewale), भावना गवळी (MP Bhavna Gavli), राजेंद्र गावीत (MP Rajendra Gavit), श्रीकांत शिंदे (MP Shreekant Shinde) यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

लोकसभेत शिवसेनेच्या खासदारांची संख्या कमी झाली तर शिवसेनेची संसदेतील ताकद कमी होईल.
लोकसभेतील त्यांचे गटनेतेपदही जाईल. एकनाथ शिंदे गटाची ताकद वाढेल. आम्हीच खरी शिवसेना,
असा दावा शिंदे गट करेल. यामुळे आगामी निवडणुकीत राज्यातील राजकीय समीकरणे बदलतील.

 

शिवसेनेत उभी फूट पडल्याने आगामी निवडणूक लढवणे अवघड होऊ शकते.
अशा स्थितीत पक्ष टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर असणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकनाथ शिंदे गटाची शिवसेना स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- CM Eknath Shinde | cm eknath shinde meeting of mps in preparing to blow up two thirds of the mps in the lok sabha bhavana gawali rajendra gawit rahul shewale shrikant shinde

 

हे देखील वाचा :

Business Idea | जगभरात ‘या’ प्रॉडक्टची आहे सर्वात जास्त धूम, लवकर बनू शकता करोडपती

Pune SPPU | पुणे विद्यापीठातील विद्यार्थांच्या आंदोलनाला अखेर यश; प्रशासनाने घेतली आंदोलनाची दखल

Mallika Sherawat | मला मेंटली टॉर्चर करण्यात आले, मल्लिका शेरावतने पुन्हा केली इंडस्ट्रीची पोलखोल, दीपिकाच्या ’गहराइयां’साठी म्हणाली…

 

Related Posts