IMPIMP

CM Eknath Shinde | ‘या’ महामार्गासाठी मी शेतकऱ्यांच्या खरेदीखतावर साक्षीदार म्हणून सह्या केल्या; मुख्यमंत्र्यांनी सांगितला किस्सा

by nagesh
 CM Eknath Shinde | The government will take a positive decision on the demand for salary hike of 'Umed' employees - Chief Minister Eknath Shinde

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन   रविवारी 11 डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी समृद्धी महामार्गाच्या बांधकामाच्या वेळी बुलढाण्यात घडलेला एक किस्सा सांगितला. आधीच्याच प्रकल्पांचे पैसे मिळाले नाहीत, अशी तक्रार करत शेतकऱ्यांनी जमिनी देण्यास विरोध केला. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी मी स्वतः शेतकऱ्यांच्या खरेदीखतावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली, असे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

 

एमएसआरडीसी खात्याची जबाबदारी माझ्यावर आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी मला आणखी एक मोठी जबाबदारी देणार असल्याचे म्हटले. त्यानुसार त्यांनी समृद्धी महामार्गाची जबाबदारी माझ्यावर सोपवली. यासाठी लागणाऱ्या अनेक परवानग्या लवकर मिळवल्या. या कामाला काही लोकांचा विरोधदेखील होता. हा मार्ग तयार करताना अनेक अडचणी आल्या होत्या. हा रस्ता सुखकर नव्हता. हा रस्ता होणारच नाही, असे अनेकांचे म्हणणे होते. पण आम्ही तो केला. जमीन अधिग्रहणदेखील आव्हानात्मक होते. नागरिकांनी प्रचंड विरोध केला. तरीदेखील आम्ही परिश्रमाने हा रस्ता उभारला, असे एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

बुलढाण्यात शेतकऱ्यांनी आम्हाला आधीच्या प्रकल्पांचे पैसे मिळाले नाहीत, अशा तक्रारी केल्या.
मी त्यांना या प्रकल्पाबाबत आश्वस्त केले. त्यांना आरटीजीएसने त्यांचे पैसे खात्यावर जमा होतील, अशी हमी आम्ही दिली.
तरीदेखील शेतकरी विश्वास ठेवत नव्हते. त्यांना पैसे जमा होतीलच याची खात्री नव्हती.
त्यावर मी त्यांना खात्री देण्यासाठी स्वत: त्यांच्या खरेदीखतावर साक्षीदार म्हणून स्वाक्षरी केली, असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

Web Title :- CM Eknath Shinde | eknath shinde tell incident of farmer in buldhana signing paper for samruddhi mahamarg

 

हे देखील वाचा :

Sulochana Chavan Passed Away | लावणीसम्राज्ञी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांचे निधन; 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

CM Eknath Shinde | फडणवीसांच्या ड्रायव्हिंगची दखल नरेंद्र मोदींनी घेतली; एकनाथ शिंदेंनी दिली माहिती

Sanjay Raut | ‘कर्नाटकचे मुख्यमंत्री काहीही बोलू देत आम्हाला घेणे-देणे नाही; आमचे मुख्यमंत्री तोंड कधी उघडणार?’ – संजय राऊत

 

Related Posts