IMPIMP

CM Eknath Shinde Group | शिवसेनेचे आणखी 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात जाणार?

by nagesh
CM Eknath Shinde Group | 3 more MPs and 8 MLAs of Shiv Sena will go to Shinde group?

बुलढाणा : सरकारसत्ता ऑनलाईन – CM Eknath Shinde Group | शिवसेनेत उरलेल्या आमदार आणि खासदारांपैकी अनेकजण आमच्या संपर्कात आहेत. ते देखील शिंदे गटात यायला तयार आहेत, असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे. येत्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार आमच्या गटात येणार असल्याचे प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) म्हणाले. (CM Eknath Shinde Group)

 

त्यामुळे ठाकरे गटात मोठी खळबळ उडाली आहे. यापूर्वी देखील खासदार जाधव यांनी मुंबईचे एक खासदार शिंदे गटात येतील, असा गौप्यस्फोट केला होता. त्यानंतर खासदार गजानन कीर्तिकर शिंदे गटात सामील झाले. आता पुन्हा एकदा खासदार जाधव यांनी ठाकरे गटाचे 3 खासदार आणि 8 आमदार शिंदे गटात सामील होतील, असा दावा केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापलथ होण्याची शक्यता आहे. निवडणूकीपूर्वी ठाकरे गटाचे घर खाली असेल, असा दावा खासदार जाधव यांनी केला आहे. (CM Eknath Shinde Group)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ठाकरे गटात जे आमदार आणि खासदार शिल्लक आहेत, ते त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वावर प्रेम आहे, म्हणून नाहीत,
तर त्यांना त्यांच्या मतदार संघात काही वैयक्तिक अडचणी असल्याने ते थांबले आहेत.
काल परवा आमच्यात शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गजानन कीर्तिकर आले होते.
त्यामुळे जशा निवडणुका जवळ येतील, तसे शिवसेनेचे घर खाली होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात बाळासाहेबांची शिवसेनाच यापुढे महाराष्ट्रात शिल्लक राहील.

 

 

Web Title :- CM Eknath Shinde Group | 3 more MPs and 8 MLAs of Shiv Sena will go to Shinde group?

 

हे देखील वाचा :

Actor Singer Utkarsha Shinde | मराठी कलाकारांनी एकत्र येऊन व्यक्त होणं गरजेचं; उत्कर्ष शिंदेची रोखठोक भूमिका

Pune Rickshaw Strike | बाईक टॅक्सी सेवेविरोधात पुण्यात रिक्षाचालक करणार बेमुदत बंद; ‘बघतोय रिक्षावाला संघटने’च्या आवाहनाला इतर रिक्षा संघटनांचा पाठिंबा

Pune Crime | सेक्स्टॉर्शनमध्ये राजस्थानचे एक संपूर्ण गाव सहभागी; पुण्यातील तरुणांच्या आत्महत्येमुळे खुलासा

 

Related Posts