IMPIMP

Pune Crime | सेक्स्टॉर्शनमध्ये राजस्थानचे एक संपूर्ण गाव सहभागी; पुण्यातील तरुणांच्या आत्महत्येमुळे खुलासा

by nagesh
Pune Crime | sextortion case two youth gave life pune police investigation took them to rajasthan where they arrest one accused found whole gurugothadi village is involve in sextortion racket

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – गेले अनेक दिवस इंटरनेटवर सेक्स्टॉर्शनच्या (Pune Crime) अनेक घटना घडत आहेत. तसेच या घटनांमुळे अनेक तरुणांना जीव सुद्धा गमवावा लागला आहे. सेक्स्टॉर्शनमध्ये एखाद्याला पहिल्यांदा फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. त्यानंतर त्यांच्याशी गप्पा मारून अश्लील गोष्टी करून घेतल्या जातात. त्यानंतर त्याचा व्हिडीओ बनवून त्याच्याकडून पैसे उकळले जातात. अशाच एका सेक्स्टॉर्शनला (Pune Crime) कंटाळून पुण्यातील दोन तरुणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. आता, याप्रकरणी पोलिसांच्या तपासात एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

राजस्थानमधील एक संपूर्ण गाव सेक्स्टॉर्शन रॅकेट चालवत असल्याचे समोर आले आहे. पुण्यातील तरुणांच्या
(Pune Crime) आत्महत्येप्रकरणात पुणे पोलिसांनी राजस्थानमधून एका आरोपीला अटक केली होती.
त्याने चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानचे गुरुगोठडी हे नावाचे संपूर्ण गाव सेक्स्टॉर्शन रॅकेट चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गावातील जवळपास 2500 नागरिक सेक्स्टॉर्शन रॅकेटमध्ये सहभागी आहेत.

 

पुण्यात या तरुणांना सेक्स्टॉर्शनच्या माध्यमातून धमकावले जात होते, त्यामुळे त्या दोघांनी आत्महत्या केली.
त्या घटनेचा तपास पुणे पोलीस करत होते. ज्या मोबाईल क्रमांकावरून या मुलांना खंडणी मागितली जात होती,
पुणे पोलिसांनी त्या क्रमांकाचे लोकेशन शोधले. ते लोकेशन राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील लक्ष्मणगड
तालुक्यातील गुरुगोठडी गावातील निघाले. पुणे पोलिसांच्या एक पथक त्या गावाकडे रवाना झाले आणि तिथून
अन्वर खान नावाच्या व्यक्तीला अटक करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, त्यावेळेस गावातील लोकांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला आणि आरोपीला सोडवण्याचा प्रयत्न केला.
तरीही पुणे पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतले. नंतर त्याने या संपूर्ण प्रकारची माहिती दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | sextortion case two youth gave life pune police investigation took them to rajasthan where they arrest one accused found whole gurugothadi village is involve in sextortion racket

 

हे देखील वाचा :

Hanuman Teaser | ‘हनुमान’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित; थेट ओम राऊत यांच्या ‘आदिपुरुष’बरोबर तुलना

Raj Thackeray | तेजस्विनी पंडित बरोबरच्या मुलाखतीत राज ठाकरेंची दिलखुलास फटकेबाजी; म्हणाले, ‘मी स्वतः कसा दिसतो, हे…’

IND Vs AUS Tour | भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन महिला संघ जाहीर; दोन नवीन खेळाडूंना संघात स्थान

 

Related Posts