IMPIMP

CM Eknath Shinde – Shivsena Uddhav Thackeray | शिंदे गटाने संधी हेरत नाशिकमध्ये टाकले जाळे! शिवसेनेचे डझनभर माजी नगरसेवक संपर्कात

by nagesh
Sanjay Raut | maharashtra in unsafe state in country say sanjay raut allegation shinde government

नाशिक : सरकारसत्ता ऑनलाइन – CM Eknath Shinde – Shivsena Uddhav Thackeray | शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Leader And MP Sanjay Raut) हे सध्या कारागृहात असल्याने नाशिककडे शिवसेनेचे दुर्लक्ष झाले आहे. यातच अंतर्गत गटबाजीतून काही शिवसेना नेत्यांनी इतरांना शिंदे गटाचा टॅग लावण्यास सुरूवात केली. ही संधी हेरत शिंदे गटाने माजी नगरसेवक प्रवीण तिदमें पाठोपाठ डझनभर माजी नगरसेवकांवर जाळे टाकले आहे. लवकरच ते शिंदे गटात टप्प्याटप्प्याने प्रवेश करण्याची शक्यता आहे. (CM Eknath Shinde – Shivsena Uddhav Thackeray)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बंडखोरीनंतर तब्बल तीन महिने नाशिक अभेद्य होते. परंतु खासदार राऊत कारागृहात गेल्यानंतर शिवसेनेचा नाशिकमधील गड आता ढासळायला लागला आहे. नाशिकमध्ये आगामी काळात शिवसेनेला मोठे खिंडार पडणार असल्याची चर्चा आता शिवसेनेतच सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला नाशिकमधूनही सुरुवातीला प्रतिसाद मिळाला.

 

जिल्ह्यातील दोन आमदार, तसेच मंत्रिपद असलेले भुसे यांच्यानंतर खासदार हेमंत गोडसेदेखील शिंदे गटात दाखल झाले होते. परंतु त्यानंतर शिंदे गटाला येथे विस्तार करण्यास फारसा वाव मिळाला नाही. नाशिकमधून जवळपास 15 हजार शिवसैनिकांनी शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते. मात्र, खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर नाशिकमधील शिवसेनेतही चलबिचल सुरू झाली.

 

शिंदे गटाला आता प्रवीण तिदमेंच्या रुपाने पहिला पदाधिकारी सापडला आहे.
त्यानंतर डझनभर माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत.
शिंदे गटाला ग्रामीणमध्ये असंतुष्ट मिळाले, पण शहरात मिळत नव्हते.
परंतु, शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे शिंदे गटाला नाशिकमध्ये पहिला महानगरप्रमुख मिळाला आहे.

 

शिवसेनेतील काही जणांकडूनच इतर माजी नगरसेवकांकडे बोट दाखवून ‘तो’ शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा पसरविल्या जात आहेत.
त्यामुळे या माजी नगरसेवकांना आपण शिवसेनेतच असल्याचे दररोज सिद्ध करावे लागत आहे.
परंतु, काहींचा संयम संपत चालला असून, लेबल लावण्यापेक्षा प्रवेशच करतो, असा इशाराच ते नेत्यांना देऊ लागलेत.
त्यामुळे आगामी काळात शिवसेनेला मोठे खिंडार पडू शकते.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना मनसेच्या नगरसेवकांवर अशाच प्रकारे नेत्यांचे ‘टॅग’ लावून बदनाम करण्यात आले होते.
त्यामुळे निवडणुकांच्या तोंडावर मनसेला गळती लागून मोठ्याप्रमाणावर नगरसेवक बाहेर पडले होते.
सध्या शिवसेनेतही अशीच स्थिती आहे.

 

Web Title :- CM Eknath Shinde – Shivsena Uddhav Thackeray | shiv sena more than 12 ex corporator likely to join shinde camp

 

हे देखील वाचा :

Face Glow | रात्री झोपण्यापूर्वी चेहर्‍यावर लावा ही वस्तू, मुरुम-फुटकुळ्या होतील दूर; चेहर्‍यावर येईल ‘नॅचरल ग्लो’

Shinde-Fadnavis Government | शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! कोरोना काळातील ‘राजकीय’ आणि ‘सामाजिक’ गुन्हे मागे

Benifits Of Drinking Coffee | ‘कॉफी लव्हर्स’साठी आली अशी खुशखबर; जाणून व्हाल खुश!

 

Related Posts