IMPIMP

Congress Leader Ranjit Deshmukh | काँग्रेसच्या ज्येष्ठ माजी मंत्र्याची मुलगा आणि सूनेच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका

by nagesh
Congress Leader Ranjit Deshmukh | congress leader ranjit deshmukhs serious allegations on son filed petition on high court

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रणजित देशमुख (Congress Leader Ranjit Deshmukh) यांनी त्यांच्या मुलाच्या विरोधातच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या (मुंबई उच्च न्यायालयाच्या) नागपूर खंडपीठात (Nagpur Bench) रणजित देशमुख (Congress Leader Ranjit Deshmukh) यांनी मुलगा आणि सून छळ करत असल्याची याचिका दाखल केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

रणजित देशमुख (Congress Leader Ranjit Deshmukh) हे सध्या मुलगा अमोल देशमुख (Amol Deshmukh) आणि सूनेसोबत राहत आहेत. त्यांनी माझा मानसिक छळ करुन मला घरातून हाकलून दिल्याचे रणजित देशमुखांनी म्हटले आहे. अमोल देशमुख यांनी लता मंगेशकर वैद्यकीय महाविद्यालयाच्या (Lata Mangeshkar Medical College) व्यवस्थापन मंडळात गैरव्यवहार केल्याचे देखील रणजित देशमुख यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे सिव्हील लाईन्समधील घरातून अमोल देशमुख आणि त्याच्या पत्नीने निघून जावे, असे आदेश देण्याची रणजित देशमुख यांनी न्यायालयाला विनंती केली.

 

उपविभागीय दांडाधिकारी व निर्वाह न्यायधिकरणाने दोनही पक्षांचे म्हणणे ऐकून घेत, या घरावर अमोल देशमुख यांचा अधिकार असल्याचा निर्वाळा दिला आहे.
तसेच हा कौटुंबिक मुद्दा असल्याने तो समुपचाराने हाताळण्याचे देखील निर्देश दिले आहेत.
यानंतर रणजित देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
गेली अनेक वर्षे देशमुख यांच्या घरात कहल सुरु आहे. पिता-पुत्राचे पटत नाही.
यापूर्वी देखील रणजित देशमुखांनी आपल्या मुलाच्या विरोधात मानसिक छळाची तक्रार सीताबर्डी पोलीस ठाण्यात (Sitabardi Police Station) केली होती. सिव्हिल लाईन्स (Civil Lines) येथील आपल्या घराच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर अमोल देशमुख याने अवैधरित्या कब्जा केला आहे, असा आरोप रणजित देशमुख यांनी केला होता.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Congress Leader Ranjit Deshmukh | congress leader ranjit deshmukhs serious allegations on son filed petition on high court

 

हे देखील वाचा :

Amol Kolhe | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर?

Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकारने लावला ठाकरे सरकारच्या काळात मंजूर झालेल्या विकासकामाला थांबवण्याचा धडाका

 

Related Posts