IMPIMP

Amol Kolhe | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर?

by nagesh
Amol Kolhe | blow for ncp is amol kolhe joining bjp know the ground report

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन  – मागील काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) भाजपमध्ये (BJP) जाणार अशी चर्चा होती. अमोल कोल्हे पक्षात नाराज असल्याची चर्चा देखील मागील काही काळ होती. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आयोजित केलेल्या चिंतन शिबीरात अमोल कोल्हे (Amol Kolhe) गैरहजर होते. आता राष्ट्रवादी काँग्रेसने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या शक्यता बळावल्या आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे (Star) प्रचारक आहेत. पण गुजरात विधानसभा निवडणुकीत आघाडीच्या प्रचारकांच्या यादीतून अमोल कोल्हे नाव वगळण्यात आले आहे. यामुळे त्यांच्या मनात नाराजी आहे. त्यामुळे ते आगामी काळात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हे त्यांच्या मतदार संघात वेळ देत नाहीत, अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची तक्रार आहे. त्यामुळे अमोल कोल्हे (NCP MP Amol Kolhe) यांना दोन दोन विरोधकांना सामोरे जावे लागत आहे. एकतर त्यांच्या मतदार संघातील त्यांचे विरोधक आणि त्यांच्या पक्षातील विरोधक यांच्या विरोधात सध्या अमोल कोल्हे यांचा वेळ जात आहे. त्यामुळे ते आगामी काळात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

 

अमोल कोल्हे मागील काळात भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या संपर्कात होते.
तसेच त्यांची भाजपसोबत जवळीक वाढली आहे. काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हे यांचा शिवप्रताप गरुडझेप
(Shivpratap Garudjhep) हा चित्रपट प्रदर्शित झाला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
(Amit Shah) यांची भेट घेतली. ही भेट राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या अनेकांना खटकली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Amol Kolhe | blow for ncp is amol kolhe joining bjp know the ground report

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मध्यरात्री घरी जाण्यास सांगणार्‍या पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड घालून खूनाचा प्रयत्न; लोणी काळभोर येथील घटना

Maharashtra Politics | शिंदे-फडणवीस सरकारने लावला ठाकरे सरकारच्या काळात मंजूर झालेल्या विकासकामाला थांबवण्याचा धडाका

Pune Crime | शेजारच्याने गुप्तांगाला इजा करुन ज्येष्ठाचा केला खून; पत्नीसह सामान घेऊन झाला फरार

 

Related Posts