IMPIMP

Corporator Archana Tushar Patil | आता सुरु होणार पुणे महापालिकेतर्फे सावित्रीबाई फुले शैक्षणिक पुरस्कार ! नगरसेविका अर्चना पाटील यांच्या मागणीला यश

by nagesh
Corporator Archana Tushar Patil | Savitribai Phule Educational Award from Pune Municipal Corporation will start now! Success to the demand of corporator Archana Patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Corporator Archana Tushar Patil | शहरात वर्षभर विविध साहित्य विषयक संमेलने, व्याख्यानमाला आयोजित केले जात असतात. पुणे मनपाच्या (Pune Corporation) वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सावित्रीबाई फुले स्मारक गंज पेठ (savitribai phule smarak ganj peth) येथे व्याख्यानमाला सुरु करण्यात यावी तसेच महिला शिक्षण क्षेत्रात नेत्र दीपक कामगिरी बजविणार्‍या महिलेस पुणे मनपाच्या वतीने सावित्रीबाई फुले शैक्षणिक पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी नगरसेविका अर्चना तुषार पाटील (Corporator Archana Tushar Patil) यांनी केली होती. याला आज पक्षनेत्यांच्या बैठकीमध्ये मंजूरी देण्यात आली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

पुणे शहर हे विद्येचे माहेर घर म्हणून देशभरात ओळखले जाते. साक्षरता हया विषयासाठी फुले दाम्पत्य यांनी केलेल्या कार्याचा गौरव इंग्रजांनी पण केला आहे. महिलांनी शिक्षण घेणे हे ज्या सनातनी काळात पाप मानले जायचे त्या काळात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले (krantijyoti savitribai phule) यांनी स्त्री शिक्षणाची पुणे शहरात पहिल्यांदा मुहूर्तमेढ रोवली.

आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी बजावत आहेत सर्व सामान्य माहिलेपासून ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांनी नेत्रदीपक यश मिळविले आहे याचे सर्व मूळ क्रांतीज्योती सावित्रीबाई तपश्चर्ये मध्ये दडलेले आहे. पुणे शहरात साहित्य, क्रीडा, कला, अभियांत्रिकी, व्यवसाय इ. सर्व क्षेत्रात स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीने सक्षमतेने कार्यरत आहेत. अशा स्त्रीयांचा गौरव करण्यात यावा. आज सावित्रीबाईंच्या नावाने पुरस्कार सुरु करण्यात येत असल्याचा मला खूप आनंद होत आहे. या पुरस्कारामुळे अनेक महिला सवित्रीबाईंची प्रेरणा घेऊन स्वता; चे आयुष्य घडवतील असे पाटील (Corporator Archana Tushar Patil) यांनी सांगितले.

 

Web Title :- Corporator Archana Tushar Patil | Savitribai Phule Educational Award from Pune Municipal Corporation will start now! Success to the demand of corporator Archana Patil

 

हे देखील वाचा :

Petrol Diesel Price Pune | पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ ! जाणून घ्या पुण्यातील नवीन दर

Indian Railways | खूशखबर ! मोदी सरकारकडून रेल्वे कर्मचाऱ्यांना ‘गिफ्ट’; तब्बल ‘एवढ्या’ दिवसांचा दिवाळी बोनस मिळणार

ST Driver Suicide | एसटी चालकाची बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या, परिसरात खळबळ

 

Related Posts