IMPIMP

Corporator Patil Archana Tushar | नगरसेविका अर्चना पाटील यांच्या मागणीला यश ! कोरोना काळात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना करात मिळणार सवलत; स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता

by nagesh
Pune Municipal Corporation (PMC) Krantiveer Lahuji Vastad Salve Corporator Archana Tushar Patil 

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Corporator Patil Archana Tushar | पुणे शहरालगत असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेने (Pimpri-Chinchwad Corporation) कोरोनामुळे मृत्यू झालेल्या (Death Due To Corona) मालमत्ताधारकांच्या कुटुंबियांना आगामी आर्थिक वर्षात सामान्य करात १००% सवलत जाहीर केलेली आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेमार्फत (Pune Corporation) पुणे शहरातील ज्या नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे अशा कुटुंबियांना आगामी आर्थिक वर्षात सामान्य करात १००% सवलत देण्यात यावी. तसेच सदर मयत नागरिकांच्या कुटुंबियांच्या मालमत्तांचे नांव हस्तांतरण करतेवेळी आकारण्यात येणारी ‘वारसा फी’ माफ करण्यात यावी. अशी मागणी नगरसेविका अर्चना तुषार पाटील (Corporator Patil Archana Tushar) यांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत (PMC Standing Committee Meeting) केली होती. या मागणीला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता मिळाली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

 

सन २०२० पासून भारतात कोरोना सारख्या महामारीने थैमान घातले आहे. यास पुणे शहर देखील अपवाद नाही. महाराष्ट्रातील कोरोनाचा पहिला रुग्ण हा पुणे शहरामध्ये सापडल्यानंतर कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत गेली. अशा वेळी प्रशासनामार्फत विविध उपाययोजना राबवून ही रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्याचे अथक प्रयत्न करण्यात आले. त्यामध्ये पुणे शहरातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित रुग्णांसाठी बेड्स राखीव ठेवणे, सर्व खाजगी रुग्रालयांबरोबर करार करून जास्तीत जास्त बेड्स ह्या करोना बाधित रुग्णांसाठी उपलब्ध ठेवणेबाबत सूचना देणे अशा अनेक उपाययोजनांचा समावेश होता.

परंतु कोरोनाची हि लहर इतकी घातक होती की यामध्ये अनेक नागरिकांना मृत्यूला सामोरे जावे लागले. कोरोनाच्या महामारीमध्ये अनेक पाल्यांनी आपले दोन्ही पालक गमावले. त्यामुळे त्यांच्या समोर उदरनिर्वाहाचा यक्षप्रश्न उभा झालेला आपण सर्वांनी पहिला आहे. त्यामुळे आगामी आर्थिक वर्षात सामान्य करात १००% सवलत देण्यात यावी अशी मागणी पाटील (Corporator Patil Archana Tushar) यांनी केली.

 

स्थायी समितीने मी केलेल्या मागणीला मान्यता दिल्यामुळे मी स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांचे आभार मानते.
कोरोना मुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना करात सवलत 100 टक्के दिल्याने याचा नक्कीच नागरिकांना फायदा होईल.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook Page for every update

 

 

 

अर्चना तुषार पाटील (नगरसेविका, स्थायी समिती सदस्य)

 

Web Title :- Corporator Patil Archana Tushar | Corporator Archana Patil’s demand succeeds! Relatives of those who died during the Corona period will receive tax relief; Approval in the meeting of the Standing Committee

 

हे देखील वाचा :

खुशखबर ! Netflix चे प्लान झाले स्वस्त ! 149 रुपयांपासून पॅकची सुरुवात, मासिक प्लान्सवर 60% पर्यंत केली ‘कपात’

Parineeti Chopra | परिणीती चोप्राने परिधान केला इतका टाईट ड्रेस की अचानक मागून फाटला अन्…

अवघे 37 हजार देऊन घरी आणा जास्त मायलेजची Maruti Alto 800, केवळ इतका होईल EMI

 

Related Posts