IMPIMP

Cryptocurrency | काय सांगता ! होय, जगात सर्वात जास्त 10.07 कोटी क्रिप्टोकरन्सी यूजर्स भारतात – रिपोर्ट

by nagesh
Cryptocurrency | india has highest number of digital currency cryptocurrencies owners in the world at 1007 crore

नवी दिल्ली : सरकारसत्ता ऑनलाइन  Cryptocurrency | भारत सरकार क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) च्या देखरेखीसाठी विधेयक आणण्याच्या तयारीत आहे, परंतु तरीसुद्धा देशात बिटकॉइन (Bitcoin) सह इतर क्रिप्टोकरन्सीबाबत लोकांची क्रेझ कायम आहे. ब्रोकर डिस्कव्हरी आणि कम्पॅरिजन प्लॅटफॉर्म BrokerChooser नुसार, क्रिप्टो मालकांच्या संख्येच्या बाबतीत भारत अव्वल आहे. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, कायदेशीर अस्पष्टता असूनही जगात क्रिप्टो मालकांची सर्वात जास्त संख्या भारतात 10.07 कोटी आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

मागील 12 महिन्यात एकुण ग्लोबल सर्चेस, क्रिप्टो (Cryptocurrency) मालकांची संख्या, ग्लोबल क्रिप्टो अडॉप्शन इंडेक्स आणि इतर फॅक्टर्सच्या आधारावर भारत सध्या 7वा सर्वात जास्त क्रिप्टो अवेयर (crypto-aware) देश आहे.
क्रिप्टो मालकांच्या बाबतीत अमेरिका 2.74 कोटीसह दुसर्‍या स्थानावर आहे.
तर यानंतर रशिया (1.74 करोड) आणि नायजेरिया (1.30 करोड) चे स्थान आहे.

BrokerChooser च्या अलिकडच्या रिपोर्टनुसार, भारतीय लोकांमध्ये क्रिप्टोबाबत जागरूकतेबाबत करण्यात आलेल्या या अभ्यासात जगातील 50 देशांचा समावेश करण्यात आला होता.
रिपोर्टनुसार, क्रिप्टो अवेयरनेस स्कोअरमध्ये भारताने 10 पैकी 4.39 अंक मिळवले.

भारताने याबाबतीत ऑस्ट्रेलिया, सिंगापुर, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी आणि जपान सारख्या देशांना मागे टाकले.
भारतात एकुण क्रिप्टो सर्चेसच्या (जवळपास 36 लाख) बाबतीत दुसर्‍या स्थानावर आहे. तर अमेरिका या बाबतीत पहिल्या नंबर आहे.

भारत सरकार देशात क्रिप्टोकरन्सीबाबत एक विशेष प्लान बनवत आहे.
मोदी सरकार (Modi government) ने संसदेत क्रिप्टोकरन्सी अँड रेग्युलेशन ऑफ ऑफिशियल डिजिटल करन्सी बिल
(Cryptocurrency and Regulation of Official Digital Currency Bill) सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
मात्र या विधेयकाबाबत माहिती अद्याप जाहीर केलेली नाही.
हे विधेयक देशात क्रिप्टोकरन्सीच्या वापराला कायदेशीर प्रकारे नियंत्रित करेल.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

Web Title : Cryptocurrency | india has highest number of digital currency cryptocurrencies owners in the world at 1007 crore

हे देखील वाचा :

Maharashtra Cabinet Meeting | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! अतिवृष्टी, पूरग्रस्तांसाठी 10 हजार कोटींचं पॅकेज

Sharad Pawar | मावळ घटनेवरुन टीका करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांवर शरद पवारांचा जोरदार पलटवार

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 129 रुग्णांचे निदान; जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts