IMPIMP

Datta Sagare | वसुमती सेवाभावी संस्थेकडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष दत्ता सागरे यांचा गौरव

by sachinsitapure
Datta Sagare

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Datta Sagare | मानवतेच्या सेवेसाठी वसुमती सेवाभावी संस्थेच्या (Vasumati Sevabhavi Sanstha) तीन वर्षपूर्तीनिमित्त समाजातील योगदानाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष दत्ता सागरे (Datta Sagare) यांना पद्मश्री डॉ. शरद मोरेश्वर हर्डीकर यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ, पानकृती देऊन सन्मानित करण्यात आले. सदरप्रसंगी संस्थेचे संस्थापक विजय आढाव, शिवाजीराव मानकर, ज्योती विजय आढाव आदी उपस्थित होते. (Pune News)

अमेरिकेतील सेंट होजेस या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची स्थापनेत सहभाग, गरजू रक्तदात्यास सहकार्य म्हणून आजपर्यंत विक्रमी १०८ वेळा रक्तदान केले, जगावर ओढावलेल्या कोरोना महामारी मध्ये दररोज ७०० देवदासी महिलांना एका वेळेस तीन महिने जेवण देण्यात आले, माजी विरोधी पक्ष नेते म्हणून पुणे महानगरपालिकामध्ये पद भूषविले, तसेच अपक्ष म्हणून नगरसेवक म्हणून पुणे महानगरपालिका काम केले, पुणे शहरातील सर्वात मोठे व सुसज्ज ससून हॉस्पिटल मधील रक्तपेढी मार्फत सुमारे १ लाख ८० हजार रक्त्यांच्या बाटल्यांचे संकलन करून गरजूंना मोफत रक्त पुरविण्यात आले.

गणेशोत्सवाच्या काळात तुळशी बागेत मोठ्या प्रमाणावर नागरिकांची रहदारी असणाऱ्या भागात आग लागली
असताना स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दोन लहान मुलांना वाचवले त्यात त्यांचे ३० % पेक्षा आगीमुळे भाजले होते
असे दत्ता सागरे यांचा सन्मान म्हणजे वसुमती संस्थेस ऊर्जा देणारा आहे.

मी करीत असलेले समाजातील सर्व घटकांसाठी सामाजिक काम हे माझे भाग्य समजतो, समाजाची सेवा करण्याची
संधी मिळो, प्रत्येक गरजू व्यक्तींपर्यंत आपली सेवा पोहचावी. तसेच संस्थेची मला गौरवीत करत माझा जो सन्मान
केला त्याचा मी कायम ऋणी राहील, असे मत दत्ता सागरे यांनी यावेळी व्यक्त केले.

Related Posts